Share

समीर वानखेडेंची झाली बदली, आता ‘या’ ठिकाणी सांभाळणार महत्वाची जबाबदारी

क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांची सोमवारी डीआरआय दिल्लीमध्ये बदली झाली आहे. त्यांनी सेवा मुदतवाढ मागितली नाही. बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज ऑन क्रूझ प्रकरणात अटक केल्यानंतर ते चर्चेत आला होते आणि महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले होते.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे झोनल डायरेक्टर म्हणून समीर वानखेडे यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपला. आता सोमवारपासून ते दिल्लीतील डीआरआयच्या संचालकांना अहवाल देतील. एनसीबीचे उच्च अधिकारी म्हणून त्यांनी मुदतवाढ मागितली नव्हती, असे यापूर्वी सांगण्यात आले होते.

इकडे महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही प्रभावशाली भाजप नेते केंद्रीय गृहमंत्रालयात वानखेडेंसाठी लॉबिंग करत असल्याचा आरोप केला आहे. वानखेडे यांचा कार्यकाळ आणखी काही काळ वाढवावा, अशी काही नेत्यांची इच्छा आहे असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

आर्यन खानच्या अटकेपासून समीर वानखेडेवर आरोपांचा भडीमार करणाऱ्या नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, समीर वानखेडे यांच्या चुकीच्या कृत्यांबद्दल नकारात्मक अहवाल असूनही, भाजपचे काही नेते केंद्रीय गृह मंत्रालयाकडे अहवाल बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. समीर वानखेडे यांनी एनसीबी मुंबईतच राहावे, अशी या नेत्यांची इच्छा आहे.

भाजप नेत्यांना जे हवे ते करू द्या. आदेश दिल्यानंतर आम्ही माहिती अधिकारांतर्गत माहिती घेऊ आणि याचा पर्दाफाश करू. नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीने गेल्या वर्षी अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक वारंवार एनसीबीवर टिका करत होते.

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला. त्यानंतर हा वाद एकोपाला गेला होता. यामध्ये समीर वानखेडेंच्या वडिलांवरही नवाब मलिकांनी टिका केली होती. नवाब मलिक मुस्लिम आहेत आणि त्यांनी खोटी कागदपत्रे दाखवून नोकरी मिळवली आहे असे मलिकांचे म्हणणे होते.

महत्वाच्या बातम्या
…आणि आयुक्तांना पाहून फुल विक्रेत्या महिलेचा मुलगा म्हणाला, ‘ए आई उठ ना गं, बघ सर आलेत’
डिजे वाजवताना सुचली भन्नाट आयडीया, आता कमवतोय करोडो रुपये
जमीन वाटून देत नाही म्हणून मुलाने जन्मदात्या आईचा घेतला जीव, बापाचीही बोटे छाटली; पुण्यातील घटना
साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर का आली सर्वांपासून तोंड लपवायची वेळ? जाणून घ्या कारण

इतर

Join WhatsApp

Join Now