महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेतील जागांचे गणित पाहिल्यास भाजप २ जागांवर आपले उमेदवार सहजपणे पाठवू शकतो. तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एका जागेवर आपला उमेदवार सहज राज्यसभेवर पाठवू शकतात. (sambhajiraje want devendra fadanvis support)
महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये काही सदस्य अतिरिक्त असल्याने दोघेही ६ जागा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असून उमेदवार उभे करणार आहेत. मात्र विद्यमान राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे.
अशात संभाजीराजेंना शिवसेना उमेदवारी देईल, असे म्हटले जात होते. पण शिवसेनेने त्यांना उमेदवारी नाकारली आहे.शिवसेनेने आपलाच उमेदवार राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसही पाठिंबा देईल हे सहाजिक आहे.
त्यामुळे संभाजीराजेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जाऊन काही उपयोग नाहीये. अशात संभाजीराजेंना एकच पर्याय उरला आहे तो म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. भाजपकडे निवडणूकीत तब्बल २२ मते अतिरिक्त आहे. त्यामुळे भाजपने संभाजीराजेंना पाठिंबा दिला तरी आणखी २० मतांची गरज असणार आहे.
तसेच संभाजीराजे आणि शिवसेनेचा उमेदवार यांच्यात झालेली लढत चुरशीची होऊ शकते. दुसऱ्या प्राधान्य क्रमावर संभाजीराजे आपली पुढील खेळी करु शकतील. मात्र भाजपने त्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे. याबाबत भाजपने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
संभाजीराजे यांच्या खासदारकीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना पुढाकार घेतला होता. दिल्लीत त्यांना नेहमीच व्हीआयपी ट्रिटमेंट मिळेल, अशी व्यवस्था त्यांनी करुन ठेवल होती. तसेच त्यांच्या अनेक मागण्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या.
तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात संभाजीराजेंचा समावेश व्हावा, यासाठीही देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले असल्याचे म्हटले जात होते. पक्षांनी मला पाठिंबा द्यावा, पण त्यांच्या चौकटीत मी काम करणार नाही या भूमिकेमुळेच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेच्या पातळीवर कोंडी झाली आहे.
संभाजीराजेंना भाजपसोबत चांगला अनुभव आहे, त्यामुळे इतर पक्षाकडून त्यांना सहज पाठिंबा मिळेल, अशी शक्यता नाही. संभाजीराजेंना २०१६ मध्ये भाजपने राष्ट्रपती नियुक्त खासदारांतून राज्यसभेवर जाण्याची संधी दिली. पण त्यानंतर पुढच्या कोणत्याही निवडणूकीत त्यांनी भाजपला सहकार्य केले नाही.
भाजपने संधी देऊनही पक्षाच्या चौकटीत काम करणार नाही, या भूमिकेवर ते ठाम राहिले. मी स्वतंत्रपणे काम करणार पण पक्षांनी मला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी आताही मांडली आहे. पण हिच भूमिका त्यांच्यासाठी अडसर ठरत आहे. त्यामुळे आता त्यांना भाजपकडून संधी मिळणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
महत्वाच्या बातम्या-
नवनीत राणा संसदीय समितीसमोरही ढसाढसा रडल्या; म्हणाल्या, ‘आता तुम्हीच न्याय द्या!’
जुळे असल्याचा घेतला गैरफायदा, भावाच्या पत्नीसोबत केलं धक्कादायक कृत्य; वाचून पायाखालची जमीन सरकेल
मराठमोळ्या लूकमध्ये सजली सचिनची लेक सारा; साडी, टिकली, नथ, गजरा आणि बरंच काही..; पहा फोटो