Share

संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो; संभाजीराजेंचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

संभाजीराजे यांनी आपण राज्यसभा निवडणूकीची सहावी जागा अपक्ष लढवणार असे स्पष्ट केले होते. तसेच आपले योगदान लक्षात घेऊन आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन संभाजीराजे यांनी सर्व पक्षांना केले होते. त्यानंतर संभाजीराजेंना महाविकास आघाडीकडून पाठिंबा मिळेल असे म्हटले जात होते. (sambhajiraje viral video)

शिवसेना संभाजीराजेंना राज्यसभेजी उमेदवारी देईल अशी चर्चा होती, पण शिवसेनेने राज्यसभेच्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांची घोषणा केली. त्यामुळे संभाजीराजेंना डावलून शिवसेनेने संजय पवारांना ही राज्यसभेची उमेदवारी दिली आहे, असे म्हटले जात आहे.

शिवसेनेनं संभाजीराजेंना पक्षात प्रवेश करुन शिवसेनेच्या तिकीटावर लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र संभाजीराजे यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून लढण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे तोडगा निघू शकला नाही आणि शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आता संभाजीराजे निवडणूकीच्या रिंगणातून माघार घेण्याची शक्यता आहे.

संभाजीराजे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्याआधीच त्यांच्या समर्थांकडून संभाजीराजेंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून संभाजीराजे समर्थकांनी राजकीय पक्षांना थेट इशारा दिला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये संभाजीराजे यांचे काही फोटो दिसत आहे. तसेच या व्हिडिओमध्ये एक डायलॉही ऐकायला मिळतो. संभाजीराजे छत्रपतींचा हा व्हिडिओ त्यांच्या समर्थकांकडून तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओत संभाजीराजे राजकीय पक्षांना आव्हान देताय असे लक्षात येत आहे.

शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कुणाचा एकाचा नसतो. तो एकाचवेळी समद्या रयतेचा असतो. पण त्याआधी स्वराज्यात ही संभाजी नावाची मोहिम उभी राहिली त्याचं काय? संभाजीला समजण्यासाठी तुम्हाला तुमचं काळीज शिवाजी सारखं करुन घ्यावं लागेल. कारण संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो, असा डॉयलॉग व्हिडिओमध्ये आहे. हा इशारा नक्की कुणाला आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसलेंना सीबीआयने केली अटक; जाणून घ्या काय आहे प्रकरण
भाजप नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच शिवसेनेचे खरे शत्रू; शिवसेनेच्या बड्या नेत्याचे धक्कादायक विधान
करण जोहरच्या बर्थडे पार्टीत ‘या’ बड्या स्टार्सनी लावली हजेरी, पहा खास क्षणांचे खास फोटो

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now