Share

शिवसेनेचा उमेदवार पराभूत होताच संभाजीराजे समर्थकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, राऊत आता कसं वाटतंय…

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभेच्या निवडणूकीचा निकाल शुक्रवारी लागला. राज्यसभा निवडणूकीत पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ‌ठरली आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. (sambhajiraje supporter on sanjay raut)

सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. रात्री उशिरा झालेल्या मतमोजणीत पहिल्या पसंतीची मतं घेऊन शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड विजयी झाले.

भाजपच्या विजयानंतर राजकारणातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. धनंजय महाडिक विजयी झाल्यानंतर आता संभाजीराजेंचे समर्थकही प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. तसेच ते समर्थक शिवसेनेला चिमटाही काढताना दिसून येत आहे. शिवसेनेचे गर्वाचे घर खाली झाल्याचे समर्थकांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे गर्वाचे घर खाली. वाचाळवीर संजय राऊत आता कसं वाटतंय गार गार वाटतंय, अशा शब्दांत माजी खासदार संभाजीराजेंच्या समर्थकांनी शिवसेना खासदार संजय राऊतांसह शिवसेनेला टोला लगावला आहे. तसेच शिवसेनेच्या नावावरुनही त्यांनी टीका केली आहे.

पक्षाच्या नावात शिव वापरुन रॉयल्टी खाल्लीत, आता शिवसेनेला शिवाजी महाराजांच्या नावाची रॉयल्टी खाऊ देणार नाही, असा इशाराही छावा प्रमुख धनंजय जाधव यांनी शिवसेनेला दिला आहे. भाजपच्या विजयानंतर धनंजय जाधव यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजीराजेंना शिवबंधन बांधायला सांगणारे मागील ३० वर्षांपासून शिवबंधन बांधलेल्या कार्यकर्त्याला निवडून आणू शकलेले नाहीत. छत्रपती संभाजीराजेंना शिवसेनेने बिनशर्त खासदार करावं अशी अनेक आमदारांची सुप्त इच्छा होती. परंतु शिवसेनेने शब्द फिरवल्याने आणि नाहक अटी शर्ती घातल्याने ते शक्य झाले नाही, असे धनंजय जाधव यांनी म्हटले आहे.

तसेच छत्रपती घराण्याचा अपमान सहन न झालेल्या आमदारांनी शिवसेना, वाचाळवीर संजय राऊत आणि महाविकासघाडीच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवुन दिली. संभाजीराजेंना जर अपक्ष परंतु पुरस्कृत उमेदवारी दिली असती तर शिवसेनेवर आज ही वेळ आली नसती. पक्षाच्या नावात “शिव” वापरुन रॉयल्टी खाललीत आता शिवसेनेला शिवाजी महाराजांच्या नावाची रॉयल्टी खाऊन देणार नाही, असे धनंजय जाधव यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘शिवसेना महाविकास आघाडीतील ‘ढ’ टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले’, मनसेचा खोचक टोला
महाडिकांच्या विजयाचे श्रेय फडणवीसांना देताना चंद्रकांत पाटलांना भावना अनावर, म्हणाले, मुंगी होऊन..
क्रीडामंत्र्यांनी रणजी ट्रॉफीत घातला धुमाकूळ, वयाच्या ३६ व्या वर्षी ठोकले शतक, रचला इतिहास

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now