बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते, त्यांचे नाव घेण्याचा सर्वांनाच अधिकार; संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावले

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे ते वाचवण्यासाठी शिवसेना नेत्यांचे प्रयत्न सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. (sambhajiraje criticize uddhav thackeray)

दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. तसेच एकनाथ शिंदे आपले गटाचे नाव बाळासाहेबांवरुन ठेवणार असल्याचे म्हटले जात आहे. पण याला शिवसेनेच्या नेत्यांकडून विरोध केला जात आहे. आता या वादात संभाजीराजे यांनी उडी घेतली आहे.

शिवसेनेने संभाजीराजे यांची राज्यसभेची उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे ते शिवसेनेवर टीका करताना दिसून येत आहे. आता बाळासाहेबांच्या नावावर बोलताना संभाजीराजे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते होते.त्यांचे नाव घेण्याचा सगळ्यांनाच अधिकार आहे.

संभाजीराजे गेवराई येथे आले होते. ते तिथे एका खाजगी इंग्रजी शाळेले उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. सध्याच्या राजकीय घडामोडींवर त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपली ही रोखठोक भूमिका मांडली आहे.

बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते होते. ते कोणत्या एका पक्षाचे नव्हते. त्यामुळे बंडखोर आमदारांना त्यांनी बाळासाहेबांचे नाव वापरु नये असे सांगणे चुकीचे आहे. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा सर्वांना हक्क आहे, अशी भूमिका संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे.

तसेच राहिला प्रश्न सध्याच्या राजकीय परिस्थितीवर माझे मत मांडण्याचा तर सरकार कुणीही स्थापन करावे. पण शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे ज्वलंत प्रश्न त्या सरकारने सोडवावे हेच माझे म्हणणे आहे, असे देखील यावेळी संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
…म्हणून दोन वेळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देता देता थांबले, हैराण करणारी माहिती आली समोर
“शिवसेना काय आहे हे केसरकरांनी सांगू नये, मी आठवीत असल्यापासून शिवसेनेत आहे”
‘उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा’; बंडखोर आमदाराची पहिल्यांदाच स्पष्ट मागणी