गुरूवारी संपूर्ण देशभरात रामनवमी उत्सव (Rama Navami Festival) मोठ्या जल्लोषात पार पडला. त्यावेळी अनेकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पण याबाबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती (Sayogitaraj Chhatrapati) यांनी एक इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस होता. यंदाच्या वर्षीचा वाढदिवस नाशिकमध्ये साजरा करण्याचे आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्ताने संयोगिता राजे यांनी नाशिकमधील विविध ठिकाणी दौरा केला. यावेळी त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराला देखील भेट दिली.
या भेटीदरम्यानचा एक किस्सा त्यांनी शेअर केला आहे.काळाराम मंदिर दर्शन घेतलेले फोटो आणि एक किस्सा त्यांनी पोस्ट केला आहे. संयोगिताराजे यांची ही पोस्ट सध्या चर्चेत असून मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या पोस्टवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केले आहे.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, संयोगीताराजे छत्रपती या कधी राजकीय व्यासपीठावर गेल्या नाहीत. पण त्या जे काही बोलतात ते फार विचार करून बोलतात. त्या सत्याची बाजू घेऊन स्पष्ट बोलतात. जे पटत नाही, ते परखडपणे सांगतात. नाशिकमध्ये त्यांना जो अनुभव आला, तो त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडला आहे. त्यांच्या परखडपणे बोलण्याचा मला सार्थ अभिमान आहे.
तसेच, अपप्रवृत्ती करणार्या लोकांनी एकदा तरी स्वतःला विचारलं पाहिजे, असं म्हणत महंतांनी मोठ्या महाराजांना भेटलं पाहिजे, असं थेट चॅनेल त्यांनी यावेळी दिलं. त्याचवेळी, आजही राज्यात अनेक मंदिरात अपप्रवृत्तीचे लोक आहेत. राज्य सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. राज्यात पगारी पुजारी नेमायला हवेत, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
दरम्यान, नाशिकच्या काळाराम मंदिरांतील तथाकथित महंतांनी पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यांच्या वारसामुळे मी ठामपणे विरोध केला. त्यावेळी अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला, असे पोस्टमध्ये संयोगीताराजे यांनी स्पष्ट सांगितले. तसेच, १०० वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या
आता ऊसाच्या रसावरही लागणार १२ टक्के GST; सरकारचा मोठा निर्णय
‘मी हिंदुत्वापासून दूर गेलो होते पण मला माझी चूक समजली, आता मी..’; उद्धव ठाकरेंची मोदींना भेटून कबुली, मोठा गौप्यस्फोट
गावकऱ्यांना दरीत काहीतरी विचित्र दिसलं, जवळ जाऊन पाहतात तर हादरवणारे दृश्य; पोलीस म्हणाले..






