राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालत असल्याने आज हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं. (Sambhaji Bhide criticises the state government )
मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला भाजपाकडून कडाडून विरोध दर्शविला आहे. तसेच श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनीही या निर्णयावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘वाईनला परवानगी देण्याचा निर्णय हा संतापजनक,’ असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘सरकारने वाइन सुरू करून जुगार लावलेला आहे. मला आर आर आबांची आठवण होते. आज ते असते तर हा वाईनचा निर्णय झाला नसता. तसेच सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी डान्सबार बंदी करण्याचा निर्णय घेतला होता असेही भिडे म्हणाले.
दरम्यान, ‘महाराष्ट्राने संपूर्ण देशाला देशपण आणि भवितव्य दिले आहे. त्यामुळे असा निर्णय घेणाऱ्या सरकारविरोधात सर्व संघटनांनी आता लढा उभारला पाहिजे. यासाठी मंत्रिमंडळाशी बोलून हा निर्णय मागे घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. अन्यथा राज्यपालांची भेट घेऊन राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचेही भिडे म्हणाले.
राज्य सरकारच्या या निर्णयावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईने कडाडून विरोध केला आहे. त्या म्हणाल्या, ‘या सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली आणि आता सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार. यांना तरुणांचे भविष्य घडवायचे आहे की अंधारात ठेवायचे? असा संतप्त सवाल देसाई यांनी उपस्थित केला.
तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेक तरूण गैरमार्गाला लागले आहेत ,गुन्हे वाढत आहेत त्यात असा निर्णय घेणे पूर्णपणे चुकीचे आहे. हे सरकार जनतेचे आहे की दारुड्यांचे, हे एकदा महाविकास आघाडी सरकारने सांगावे, असे म्हणत देसाई यांनी राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
सिद्धू सापडले वादाच्या भोवऱ्यात; बहिणीने रडत केले ‘हे’ गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
दारूच्या नशेत स्वत:च्याच मुलीवर करत होता बलात्कार, पत्नीने हातोड्याने केला पतीचा खून
जितेंद्र आव्हाड यांचं मुलांच्या जातीवरील ट्वीट चर्चेत; “बापाची जात बंधनकारक का? आई हा…”
“उद्धव ठाकरेंनी मद्यक्रांती घडवलीय, त्यांना घेऊन ‘क्रांतिवीर’ पार्ट-२ काढता येईल”