गेल्या काही महिन्यांपासून दक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही चांगलीच चर्चेत आहे. तिने काही महिन्यांपूर्वी नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतला होता. हे कपल भारतातील सर्वात चांगल्या सेलिब्रिटी कपल्सपैकी एक होते. पण अचानक त्यांनी घटस्फोट घेतल्यामुळे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. (samantha second highest paid actress)
आता समंथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. समंथा रुथ प्रभू ही दक्षिणात्य इंडस्ट्रीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. पुष्पा: द राइजच्या यशानंतर, रश्मिका मंदान्ना सर्वात जास्त मानधन घेणार्या अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. तर आता सामंथा रुथ प्रभू ही दुसरी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.
समंथा रुथ प्रभूने पुष्पा चित्रपटातील ओ अंतवा या गाण्यावर आपला जबरदस्त डान्स दाखवून लाखो प्रेक्षकांची मने जिंकली होती. फॅमिली मॅन २ वेब सीरिजपासून हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये समंथाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे समंथा तिची अभिनयाची फी सुद्धा वाढवत आहे.
समंथा रुथ प्रभू दक्षिणेतील सर्वाधिक मानधन घेणारी दुसरी अभिनेत्री ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री तिच्या बॉलिवूड पदार्पणापूर्वी तिच्या नवीन चित्रपटांसाठी ३ ते ५ कोटी घेत आहे. प्रोडक्शन हाऊस पाहून समंथा तिच्या फीची मागणी करते.
रिपोर्ट्सनुसार, समंथाने पुष्पा चित्रपटातील ओ अंतवा गाण्यासाठी पाच कोटी रुपये घेतले होते. अभिनेत्रीची ही फीस जाणून घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, पण हे खरे आहे. समंथा रुथ प्रभूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकतेच तिच्या शकुंतला या नवीन चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
या चित्रपटात अभिनेत्री एका सुंदर राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. समांथाचे चाहते तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासोबतच ती यशोदा या चित्रपटातही दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे कोणतेही पोस्टर रिलीज करण्यात आलेले नाही. पण रिपोर्ट्सनुसार, मेकर्सनी यशोदासाठी करोडो रुपये खर्च केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
IPL 2022: लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्सला केले टाटा-बाय; आता ‘या’ संघाला गोलंदाजी शिकवणार
अभिनेत्री जुई गडकरीला झालाय गंभीर आजार; पोस्ट शेअर करत म्हणाली, हळूहळू शरीरातील अवयव..
अजय देवगणची मेहूणी शोधतेय स्वत:साठी मुलगा; म्हणाली, मी असा मुलगा शोधतेय ज्याच्यासोबत…