Share

सलमान खानचा आणखी एक कांड उघड, कोर्टाच्या आदेशानंतर भाईजानच्या अडचणी वाढल्या

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानला नुकताच काळवीट शिकार प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. सलमानच्या याचिकेवर सुनावणी करताना राजस्थान उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी करण्याचे मान्य केले होते. मात्र आता या अभिनेत्याच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. (salman khan summons for new case)

बॉलीवूड अभिनेता सलमान खानने पत्रकाराशी गैरवर्तन केल्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईच्या अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने अभिनेता सलमान खानला ५ एप्रिलला कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने अभिनेत्याला आयपीसी कलम ५०४ आणि ५०६ अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यासाठी समन्स बजावले आहे.

पत्रकार अशोक पांडे यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी मुंबईच्या अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला नोटीस बजावली आहे. आयपीसीच्या कलम ५०४ आणि ५०६ अंतर्गत दाखल झालेल्या खटल्यात न्यायालयाने सलमान खानला पुढील महिन्यात ५ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने बॉलीवूड अभिनेता सलमान खान विरोधात दाखल झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी समन्स जारी केले असून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण २०१९ च्या पत्रकार अशोक पांडेशी संबंधित आहे.

अशोक पांडे यांनी सलमान खानवर आपल्याशी गैरवर्तन आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता. या टीव्ही पत्रकाराने सलमान सायकल चालवत असताना त्याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सलमान खानने त्याच्याशी गैरवर्तवणूक केली होती.

५६ वर्षीय सलमान खानला अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्याला आयपीसीच्या कलम ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्ह्यांसाठी समन्स बजावण्यात आले आहे. अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने सलमान खानला ५ एप्रिल २०१९ रोजी पत्रकार अशोक पांडे यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी दाखल केलेल्या प्रकरणात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

महत्वाच्या बातम्या-
भाजपचे बडे नेते २-४ दिवसांत तुरुंगात जाण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांनी दिले ट्रॅक रेकॉर्ड काढण्याचे आदेश
तुमच्या अशा वक्तव्यांची जागा केराच्या टोपलीत आहे; सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊतांना फटकारले
चालत्या बसमध्ये बिअर पित होते विद्यार्थी-विद्यार्थीनी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चौकशीचे आदेश

ताज्या बातम्या बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now