Share

सोनाक्षी नाही, तर ‘या’ अभिनेत्रीशी ठरलं होतं सलमानचं लग्न, पत्रिकाही छापल्या होत्या; पण पुढे…

सलमान खान ५६ वर्षांचा असला तरी तो अजूनही एकटा आहे. त्याचे नाव अनेक सौंदर्यवतींशी जोडले गेले असले तरी कोणाशीही त्याचे लग्न झालेले नाही. अशात त्याचे गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी सिन्हाबरोबरचे लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. पण हे फोटो नकली असल्याचे समोर आले आहे. (salman khan girlfriend sangeeta bijlani)

सलमान खान लग्न कधी करणार? असा प्रश्न अनेकदा लोक विचारतात पण आजपर्यंत या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. मात्र, सुपरस्टार सलमान खान लग्न करणार होता हे तुम्हाला माहीत आहे का? अभिनेत्याच्या लग्नाची तारीखही निश्चित झाली होती आणि कार्डही छापण्यात आले होते. मात्र, शेवटच्या प्रसंगी हे नाते तुटले.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सलमान खानचे लग्न कोणासोबत ठरले होते आणि ते नाते का तुटले? मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानचे लग्न त्याची गर्लफ्रेंड संगीता बिजलानीसोबत निश्चित झाले होते. लग्नाची तारीख २७ मे १९९४ होती.

लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. मात्र, एका कारणामुळे हे लग्न होऊ शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता बिजलानीला सलमान खानवर संशय होता. या शंकेने अभिनेत्री सलमान खानवर नजर ठेवू लागली. दरम्यान, सलमान अभिनेत्री सोमी अलीला फसवून तिच्याशी रोमान्स करत असल्याचे संगीताला समजले.

संगीता बिजलानीला इतकं वाईट वाटलं की सगळी तयारी करूनही तिने सलमान खानसोबतचं लग्न रद्द केलं होतं. पण तिने फक्त लग्न मोडलं तिने सलमानसोबतची मैत्री तशीच ठेवली. सलमान खान आणि संगीता बिजलानी अजूनही चांगले मित्र आहेत आणि अनेकदा भेटत राहतात.

सलमान खानसोबतचे लग्न मोडल्यानंतर संगीता बिजलानीच्या आयुष्यात भारतीय क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनची एन्ट्री झाली. एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली होती, त्यानंतर काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर १९९६ मध्ये त्यांनी लग्न केल्याचे सांगितले जाते. मात्र, लग्नाच्या १४ वर्षानंतर २०१० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

महत्वाच्या बातम्या-
“म्हणजे उद्या खाजगीमध्ये आम्ही आमच्या बायकांशीही बोलायचं नाही का?” राष्ट्रवादी फडणवीसांवर संतापली
“रात्री मोठ्याने गाणी लावत रस्त्यावर गाड्यांचे स्टंट करणं हे छत्रपतींचे विचार आहेत का?”
वाईडसह क्रिकेटच्या ‘या’ नियमांमध्ये झाले मोठे बदल; झेलबाद झाला तरी फलंदाज..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now