कलर्स वाहिनीवर सुरू असलेला ‘बिग बॉस’ (bigg boss) हा सध्या खूप चर्चेत आहे. या शोचा हा १५ वा सीजन सुरू आहे. या सीजनच्या काही स्पर्धकांमुळे हा सीजन खूप चर्चेत आहे. त्याचबरोबर या शोचा होस्ट अभिनेता सलमान खान (salman khan) मागील अनेक वर्षांपासून हा शो होस्ट करत आहे. या शोच्या प्रत्येक ‘वीकेंड का वार’ मध्ये सलमान खान कलाकारांना पाहुणे म्हणून बोलावत असतो. (mithun daa and salman khan friendship)
त्याचबरोबर यावेळी सलमानने ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती (mithun chakravarti) उर्फ दादा यांना ‘बिग बॉस १५’ मध्ये पाहुणे म्हणून बोलावले आहे. यासोबतच या शोचा एक प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये सलमान खान आणि मिथुन चक्रवर्ती एकमेकांची चेष्टा करताना दिसत आहेत. त्याचबरोबर सलमान खान अनोख्या पद्धतीने मिथुन दादा यांचे स्वागत देखील करतो.
तसे पाहायला गेले तर मिथुन दादा हे रिअलिटी शो ‘हुनरबाज’ या शोच्या प्रमोशनसाठी बिग बॉस मध्ये आले आहेत. याच दरम्यान सलमान खान मिथुन दादांची चेष्टा करत म्हणतो की, “दादा हे तुमच्यासाठी आहे.” असे म्हणत सलमान मिथुन दादांच्या स्वागतासाठी ‘आय एम डिस्को डान्सर’ या गाण्यावर दादांच्या स्टाईलमध्ये डान्स करतो.
त्यानंतर मिथुन दादा स्टेजवर येतात आणि त्यानंतर दोघेही या गाण्यावर परफॉर्म करतात. त्यानंतर सलमान आणि मिथुन दादा ‘याद आ रहा है तेरा प्यार’ या गाण्यावरही डान्स करतात. यानंतर सलमान पुढे म्हणतो की, “ईस्ट या वेस्ट मिथुन दा इज बेस्ट, यात काही शंका?” हे ऐकून मिथुन दादा देखील हसू लागतात. त्यानंतर सलमान आणखी एक डायलॉग मारतो.
सलमान म्हणतो की, “पळण्यासाठी घोडा आणि मारण्यासाठी हातोडा.” एवढे म्हणत सलमान जोरजोरात हसू लागतो. तेव्हा मिथुन दादा म्हणतात की, “तू मला यासाठी बोलावलं आहे का?” आपल्या सर्वांचं माहिती आहे की, सलमान खान आणि मिथुन दादांची खूप चांगली मैत्री आहे. मिथुन दादा आणि सलमान खान या दोघांनी ‘वीर’ आणि ‘किक’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. पण चाहत्यांना ‘वीर’ या चित्रपटातील त्यांचा बाँड खूप आवडला होता.
त्याचवेळी मिथुन चक्रवर्ती ‘लकी’ या चित्रपटातही दिसले होते. आता मिथुन दादा ‘हुनरबाज’ या रिअलिटी शोमध्ये दिसणार आहेत. या शोमध्ये ते परिक्षकांची भूमिकेत दिसणार आहेत. ‘हुनरबाज – देश की शान’ या शोमध्ये मिथुन दादां व्यतिरिक्त, परिणीती चोप्रा आणि करण जोहर देखील त्यांच्यासोबत शो होस्ट करणार आहेत.