Share

काय होतास तू? काय झालास तू? अरे वेड्या कसा वाया गेलास तू? सक्षणा सलगरांची राज ठाकरेंवर टिका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि शरद पवार हे जातीयवादाचे राजकारण करत आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला होता. (sakshana salgar criticize raj thackeray)

राज ठाकरेंच्या भाषणानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या राज्यात मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा वाद पाहायला मिळत आहे. आता राज्यभर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची परीसंवाद यात्रा सुरु आहे. या सभेतही राष्ट्रवादीचे नेते राज ठाकरेंवर टीका करताना दिसून येत आहे.

मंगळवारी इस्लामपूर येथे राष्ट्रवादीची सभा झाली या सभेत राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी आता राज ठाकरेंवर टीका केली आहे. अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू? असा टोला सक्षणा सलगर यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. त्यामुळे सध्या त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहे.

जयंत पाटलांना नाव ठेवून ज्यांना आपल्या भाषणाची उंची वाढवायची होती, त्या राज ठाकरेंना मला सांगायचंय की जयंत पाटलांच्या नावात जय आहे. परंतू राज ठाकरेंच्या पोटामध्ये जातीयतेचे आणि धर्माचे जंत वाढले आहेत. म्हणून त्यांना जंत पाटील असं सूचलं असेल, असे सक्षणा सलगर यांनी म्हटले आहे.

तसेच जयंत पाटील काही पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आमदार नाही झालेत. काही लोक अर्ध्या हळकुंडात पिवळे होतात, पण जयंत पाटील हे त्यांच्या मतदार संघातून सलग सात वेळा आमदार म्हणून निवडून आलेत. हजार आणि दोन हजार नाही तर ८५ हजारांच्या फरकाने ते जिंकून आले आहेत, असेही सक्षणा सलगर यांनी म्हटले आहे.

तसेच राज ठाकरे यांनी पवारांवर टीका केली म्हणून त्यांना उत्तर द्यावे लागते. आता तुम्ही अयोध्येला जाताय. का तर दुसरा मुद्दाच नाहीये, फक्त हिंदू-मुस्लिम करायचं? काही फरक पडत नाही, तुम्ही अयोध्येला जा नाही तर कुठेही जा. मी एकच म्हणेन, काय होतास तु काय झालास तु, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू? अशी खरमरीत टीका सक्षणा सलगर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
मशिदींसमोरील हनुमान चालिसेला विरोध करणाऱ्या पोलीस आयुक्त पांडेना पदावरून हटवले
बार्शीतील जवानाला वीरमरण; शेवटच्या क्षणी मुलाला म्हणाले होते, बाळा रडू नको मी खाऊ घेऊन येतो…
‘गाढव तुरुंगात जाताच लालपरी मुक्त झाली’, सामनाच्या अग्रलेखातून सदावर्ते यांच्यावर टीका

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now