तामिळ-तेलुगू चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीच्या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. तिच्या आगामी ‘विराट पर्वम’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मीडिया मुलाखतीत तिने हिंसा आणि धर्माच्या मुद्द्यावर बॉलीवूडच्या प्रसिद्ध चित्रपट कश्मीर फाइल्सचा संदर्भ दिला आणि सांगितले की, त्या वेळी काश्मिरी पंडितांची हत्या कशी झाली हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
पुढे ती म्हणाली की, त्यापलीकडे जाऊन हिंसाचाराला धर्माशी जोडून बघितले तर काही दिवसांपूर्वी गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणाऱ्या मुस्लिम व्यक्तीलाही मारहाण करून जय श्री रामचा नारा देण्यास सांगितले होते या दोन घटनांमध्ये काय फरक आहे? असं ती म्हणाली. तिच्या या वक्तव्यानंतर लोकं संतापले आहेत.
विराट पर्वमध्ये सई एका नक्षलवाद्याच्या प्रेमात पडलेल्या तरुणीची भूमिका साकारत आहे. हा तेलुगु चित्रपट 17 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. याच्या प्रमोशनदरम्यान सईने एका मीडिया मुलाखतीत अनेक गोष्टी सांगितल्या. या चित्रपटातील एका नक्षलवादी तरुणावर तिचे प्रेम असल्याने तिच्यावर कधी डाव्या विचारसरणीचा प्रभाव पडला आहे का?
असे विचारले असता ती म्हणाली की, ती कोणाच्याही बाजूने नाही. मात्र यानंतर तिने काश्मीर फाइल्सच्या निमित्ताने धर्म आणि हिंसाचारावर चर्चा केली आणि समाजात जो काही वर्ग दडपला जातो, त्याला संरक्षण दिले पाहिजे, मग तो डाव्या विचारसरणीची असो वा उजव्या विचारसरणीचा भेदभाव केला नाही पाहिजे, असं ती म्हणाली.
साई म्हणाली की, आपल्याला चांगले माणूस बनण्याची गरज आहे. आपण जर चांगले माणूस असाल तर कोणालाही त्रास देणार नाही. ती म्हणाले की, न्याय लेफ्ट किंवा राईट बघत नाही. जर तुम्ही माझ्यापेक्षा बलवान आहात आणि माझ्यावर दबाव आणत असाल तर तुम्ही चुकीचे करत आहात.
मोठा वर्ग समाजातील छोट्या वर्गाला दडपत असेल तर ते चुकीचे आहे. स्पर्धा दोन समान लोकांमध्ये असावी. विराट पर्वममध्ये सईसोबत राणा दग्गुबती, प्रियामणी आणि नंदिता दास देखील दिसणार आहेत. ही प्रेम आणि राजकारणाची संमिश्र कहाणी आहे. राणा दग्गुबती या चित्रपटाचा निर्माताही आहे.
महत्वाच्या बातम्या
किळसवाणे! पुतिन यांच्यासोबत बॉडीगार्डदेखील जातात वॉशरूमममध्ये, करतात ‘हे’ विचित्र काम
बागेत गेलेली महिला परतलीच नाही, सकाळी अजगराच्या पोटात सापडला मृतदेह, वाचून हादराल
…म्हणून अजितदादांना भाजप नेत्यांनी भाषण करू दिले नाही; रोहीत पवारांनी सांगीतले कारण
शेतकऱ्यांनो! शेतात सौर पंप बसवण्यावर 90% सबसिडी, वाचा संपूर्ण माहिती