Politics: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मधील साई रिसाॅर्टचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. साई रिसाॅर्ट प्रकरणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना इडीने ताब्यात घेतल आहे. सदानंद कदम यांना घेऊन इडी मुंबईकडे रवाना झाली आहे.
रिसाॅर्टचे मालक आणि उद्योजक सदानंद कदम यांना आज शुक्रवारी पहाटे ईडीच्या अधिकार्यांनी ताब्यात घेतलं. सदानंद कदम यांना अटक झाली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यासाठी हा मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.
या घटनेनंतर रामदास कदम यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. साई रिसाॅर्ट हे अनिल परब यांचे नाही. हे रिसॉर्टन रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम याचे आहे, असा गौप्यस्फोट जानेवारी महिन्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला होता.
यादरम्यान आता रिसाॅर्टनचा मुद्दा समोर आला असला तरीही एक राजकीय पक्षाच्या सभेला आर्थिक पाठबळ दिल्यामुळे या कारवाईला प्रचंड वेग आल्याची चर्चा सुरू आहे. सदानंद कदम यांना इडीने अटक केल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करून दिली आहे.
मात्र, अद्यापही या वृत्ताला ईडीने दुजोरा दिलेला नाही.जिल्ह्यातील वादग्रस्त साई रिसाॅर्टच्या प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. सध्या या रिसाॅर्टची वेगवेगळ्या पातळीवर चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
महाराष्ट्रात पुन्हा पेटणार राजकीय युद्ध! ‘या’ तीन मोठ्या नेत्यांनी ठोकला शड्डू, भाजप-शिंदेंचं टेंशन वाढलं
नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत का गेली? अखेर सुप्रिया सुळेंनी सांगीतले खरे कारण, वाचून धक्का बसेल
राष्ट्रवादीने आम्हाला पाठींबा दिल्यास स्वागत करू; शिंदे गटाच्या बड्या नेत्याने दिले नव्या युतीचे संकेत