सध्या रयत क्रांती संघटनेचे नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत हे चांगलेच चर्चेत आले आहेत. गुरुवारी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी हॉटेलचे बिल न दिल्याने हॉटेल मालकाने त्यांचा ताफा अडवला. सोलापूर जिल्ह्यातील सांगोलो येथे हा प्रकार घडला. सध्या हे प्रकरण चांगलच तापलं आहे.
याच प्रकरणावरून खोत यांनी राष्ट्रवादीला टार्गेट केलं आहे. आज खोत यांनी थेट पत्रकार परिषद घेत तो हॉटेलवाला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा पुरावा दिला आहे. यामुळे आता या प्रकरणाला वेगळ वळण लागणार असल्याच बोललं जातं आहे. मात्र यावर अद्याप राष्ट्रवादीची प्रतिक्रिया आलेली नाहीये.
पत्रकार परिषदेदरम्यान खोत यांनी ‘अशोक शिनगारे हा राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता असल्याचा दावा खोत केला आहे. खोत यांनी थेट शिनगारे यांचे राष्ट्रवादी कार्यालयातील फोटो दाखवले आहे. तसेच जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी बनविण्यात आलेल्या पॉम्प्लेटवरही शिनगारे यांचा नेते म्हणून फोटो असल्याचाही पुरावा खोत यांनी सादर केला आहे.
दरम्यान, या हॉटेल मालकाने खोत यांनी हॉटेलचे ६६ हजार रुपये थकवल्याचा खळबळजनक आरोप केला. या आरोपानंतर खोत यांनी या हॉटेल मालकाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. माझ्यावर खुनी हल्ला करण्याचा हा राष्ट्रवादीचा प्लॅन होता, असा गंभीर आरोप खोत यांनी केला.
वाचा नेमकं प्रकरण काय..? २०१४ मध्ये माढा लोकसभा निवडणुकीत खोत रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत प्रचारावेळी सदाभाऊ खोत यांच्या मुलाने कार्यकर्त्यांना जेवायला शिनगारे यांच्या हॉटेलला नेलं. त्याठिकाणी हॉटेलचं बिल ६६ हजार ४५० रुपये झाले.
मात्र हे पैसे नंतर देतो सांगत ते निघून गेले. तेव्हापासून हॉटेल मालकाला हे पैसे मिळाले नाहीत असा शिनगारे यांचा खळबळजनक आरोप आहे. त्याचसोबत सदाभाऊ खोत मंत्री झाले तेव्हा पाठपुरावा केला, केवळ देऊ, बघू केलं त्यामुळे गुरुवारी हॉटेलमालकाने खोत यांना सोलापूरात घेरलं
महत्वाच्या बातम्या-
राज्यसभेच्या निवडणुकीत कोणी कलाकारी केल्या मला माहितीये; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
VIDEO: उद्घाटनानंतर बोगद्यामध्ये पंतप्रधान मोदींना दिसला कचरा, त्यानंतर त्यांनी जे केलं ते पाहून सगळेच झाले शॉक
मिर्झापुर ३ चे शूटिंग सुरू होण्याच्या आधीच कालीन भैयाने सांगून टाकली संपूर्ण कहाणी, अनेक प्रश्नांची मिळाली उत्तरे