‘सदाभाऊ तुमची अवस्था ही केतकी चितळे सारखी नाही तर…भारतीय जनता पार्टी च्या नादाला लागून नटरंग मधल्या अतुल कुलकर्णी सारखी झालीये,’ अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप नेते सदाभाऊ खोत यांच्यावर केली आहे.
काही दिवसांपूर्वीच केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. सध्या ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. त्यानंतर पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतलं होतं. चितळेच्या प्रकरणावरुन सदाभाऊ खोत यांनी एक मोठे वक्तव्य केले होते.
केतकी चितळेच्या पोस्टमुळे पाटील मेला आहे की नाही हे कळलं, फडणवीस साहेब तुम्ही परत या, आमची सुद्धा केतकी चितळेसारखी अवस्था झाली आहे, असे वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले होते. जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा या अभियात बोलत असताना त्यांनी असे वक्तव्य केले होते.
याचच धागा पकडत सूरज चव्हाण यांनी ट्विट करत खोत यांना लक्ष केलं आहे. ट्विटमध्ये चव्हाण म्हणतात, ‘सदाभाऊ तुमची अवस्था ही केतकी चितळे सारखी नाही तर…भारतीय जनता पार्टी च्या नादाला लागून नटरंग मधल्या अतुल कुलकर्णी सारखी झालीय.. आता आम्ही एवढंच म्हणू शकतो गडी चांगला होता,’ असं खोचक ट्विट त्यांनी केलं आहे.
सदाभाऊ तुमची अवस्था ही केतकी चितळे सारखी नाही तर…भारतीय जनता पार्टी च्या नादाला लागून नटरंग मधल्या अतुल कुलकर्णी सारखी झालीय.. आता आम्ही एवढंच म्हणू शकतो गडी चांगला होता. @Sadabhau_khot
— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) May 21, 2022
दरम्यान, काही दिवसांपूर्वी देखील सूरज चव्हाण यांनी खोत यांच्यावर जहरी शब्दात टीका केली होती. ‘सदाभाऊ खोत हे आमदारकीसाठी फडणवीसानी सांगितले तर साडी नेसतील, असं सूरज चव्हान यांनी म्हंटलं होतं. सध्या केतकी प्रकणावरून सुरज चव्हाण सदाभाऊ खोत आमनेसामने आले आहेत.
वाचा केतकीचे समर्थन करताना काय म्हंटलं होतं सदाभाऊ खोत यांनी… सदाभाऊ खोत यांनी केतकीला समर्थन देताना ठाकरे सरकारला खडेबोल सुनावले होते. “केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावं लागेल,’ असं त्यांनी म्हंटलं होतं.
‘मला केतकीचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वत:ची बाजू मांडली. तुम्ही केलं तर पाटलांच्या पोरानं केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा,’ असं खोत यांनी म्हंटलं होतं. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होताच खोत यांनी आपले विधान मागे घेतले.
महत्त्वाच्या बातम्या
‘देशात रॉकेल शिंपडण्याचे काम भाजपचं, तर काँग्रेसकडे आग विझविण्याची जबाबदारी,’ राहुल गांधी स्पष्टच बोलले
ताजमहालाचा वापर एकेकाळी मराठ्यांनी घोडे बांधायला केला होता; वाचा मराठ्यांच्या पराक्रमाचा भन्नाट किस्सा
लाल महालातील लावणीचा वाद! अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक; गौमूत्राने केले शुद्धीकरण
हल्मेट घालूनही चालकाला भरावा लागू शकतो २००० रुपयांपर्यंत दंड; जाणून घ्या काय आहे नियम