सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सत्ताधारी, विरोधकांमद्धे आरोप – प्रत्यारोपांचे सत्र रंगले असतानाच राजकीय वर्तुळातून एक वेगळी बातमी समोर येत आहे. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतं आहे.
चला तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय..? सोलापूर जिल्ह्यातील सांगोलो येथील हा व्हिडिओ आहे. हॉटेलात पार्टी केल्यानंतर बिल दिले नसल्याच्या कारणावरून हॉटेल मालकाने थेट माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा ताफा आडवला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
२०१४ मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री सदाभाऊ यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सदाभाऊंनी कार्यकर्त्यांना खुश ठेवले. मात्र आता तेच खोत यांच्या चांगलच अंगलट आल्याच पाहायला मिळत आहे. हॉटेल मालकाने थेट खोत यांच्या गाड्यांच्या ताफा अडवला.
एवढच नाही तर, त्या हॉटेल मालकाने खोत यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर गोंधळ घातला आहे. मांजरी येथील अशोक शिनगारे असे या व्यक्तीचे नाव आहे. ‘सदाभाऊ २०१४ चे हॉटेल बिल आहे ते द्या आणि पुढे जावा,’ असे म्हणत त्या व्यक्तीने खोत यांना रोखले आहे. यावेळी तेथे बाचाबाची देखील झाली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर खोत यांनी स्पष्टीकरण देताना म्हंटलं आहे की, ‘मी २०१४ पासून मी १५ वेळा सांगोल्यात आलो आहे. मी त्या माणसाला ओळखत नाही,’ असं खोत यांनी स्पष्ट म्हंटलं आहे. राष्ट्रवादीकडून बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे खोत यांनी यावेळी सांगितलं आहे.
तर दुसरीकडे हे प्रकरण थेट पोलिस ठाण्यात गेलं आहे. खोत यांनी हॉटेल मालकाविरोधात सांगोला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली. तर दुसरीकडे ‘मी कार्यक्रम संपल्यानंतरही भाऊना पैसे दिल्याशिवाय जाऊ देणार नाही असा पवित्रा त्या हॉटेल मालकाने घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
पेन्शन कपात करायची असेल तर लाखो पगार घेणाऱ्या मंत्र्यांची करा, अग्निपथ विरोधात विद्यार्थ्यांचा संताप
आईचं मंगळसुत्र विकून दंड भरायला आला तरूण, RTO ला समजताच उचललं ‘हे’ पाऊल, होतंय कौतुक
‘पाकिस्तानी टिमचा कोच झाल्यावर सांगेन’, जेव्हा रोहितच्या वक्तव्याने सगळे पोट धरून हसले होते