सदाभाऊ खोत यांनी हॉटेलचे बिल न भरल्यामुळे हॉटेल मालकाने त्यांचा ताफा अडवला होता. गुरुवारी हा सर्व प्रकार घडला असून राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा सुरु आहे. संबंधित घटना ही सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे घडली होती. या घटनेनंतर राजकीय नेतेही प्रतिक्रिया देताना दिसून आले होते. (sadabhau khot eating homemade food in hotel)
सांगोला येथील एका हॉटेलमध्ये सदाभाऊ खोत यांच्या कार्यकर्त्यांनी पार्टी केली होती. त्यानंतर बिल न देता ते तसेच निघून जात होते. त्यामुळे हॉटेल मालकाने त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. तसेच त्यांच्याकडून पैशांची मागणी केली होती. सध्या हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.
असे असतानाच आता सदाभाऊ खोतांचा एक फोटो समोर आला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सदाभाऊ खोत यांचा हा फोटो एका थ्री स्टार हॉटेलमधला आहे. त्यांनी शुक्रवारी सकाळी तिथे चक्क कार्यकर्त्यांनी घरुन आणलेल्या जेवणाची न्याहरी केली आहे.
सदाभाऊ खोत यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. त्यामुळे त्यांनी हॉटेलच्या उधारीचा धसका घेतला की काय? अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सदाभाऊ गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर दौऱ्यावर असून ते वेगवेगळ्या भागांची पाहणी करत आहे.
सदाभाऊ खोत जेव्हा सांगोल्यात आले होते, त्यावेळी हॉटेल मालक अशोक शिनगारे यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला होता. तसेच माझ्या हॉटेलचे थकवलेले बिल द्या आणि त्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला जावा, असे शिनगारे यांनी सदाभाऊ खोतांना म्हटले होते. त्यावेळी तिथे काय करावे हे सदाभाऊ खोतांना सुचत नव्हते, पण कशी तरी त्यांनी तिथून त्यांची सुटका केली होती.
त्यानंतर सदाभाऊ खोत शुक्रवारी सोलापूरातील थ्री स्टार हॉटेलमध्ये गेले होते. तिथे त्यांनी कार्यकर्त्यांनी आणलेल्या जेवणावर ताव मारला. ते घरगुती ज्वारीची भाकरी, चटणी शेंगा, मिरचीचा ठेचा यांचा आस्वाद घेताना दिसून आले. पण थ्री स्टार हॉटेलमध्ये सदाभाऊ खोत घरचे जेवण का करत आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
नाद खुळा! दहावी पास झाल्यानंतर पठ्याची मित्रांनी काढली बैलगाडीतून मिरवणूक, व्हिडीओ व्हायरल
‘या’ दोन शेअर्समुळे झुनझनवालांचे १५ मिनिटांत बुडाले ९०० कोटी, तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?
भावानेच बहिणीला दिली फाशी, जीव जाईपर्यंत तिथेच थांबला, धुळ्यातील ‘सैराट’ने महाराष्ट्र हादरला