Share

अमोल मिटकरी हा तमाशाच्या फडावरचा नाच्या तर शरद पवार…., सदाभाऊ खोतांचा जोरदार तडाखा

भाजपचे सहयोगी आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी अमोल मिटकरींवरही ताशेरे ओढले. ते म्हणाले की, अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या आहे. त्यांचे फार मनावर घेण्याचा प्रश्न नाही.

सध्या राज्यात राणा दाम्पत्याचे प्रकरण जोमात आहे. त्यांना अटक झाल्यानंतर किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्लाही कोणापासून लपलेला नाहीये. त्याचा व्हिडीओही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत.

अशातच आता सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी हे भाजप आणि इतर विरोधकांना नेहमी सडेतोड उत्तरं देत असतात. विरोधकांवर जहरी टीका करण्यासाठी ते ओळखले जातात. मिटकरींचे भाषण ऐकायलाही मोठा जनसमुदाय गोळा होत असतो.

त्यावरून सदाभाऊ खोत आता आक्रमक होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीवर टीका करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, काही काळ यांचं नाचगाणं चालेल. फड मालकाला चांगलं वाटत असेल पण तोडा-फोडा अशी राष्ट्रवादीची निती आहे. अनेक नेते प्रत्येक समाजाचे घ्यायचे आणि जातीयवाद करायचा. तर दुसरीकडे शरद पवार साहेब आपले तारणहार आहेत.

हे समाजाला समजावण्याचं काम राष्ट्रवादीमधील नेते करतात. महाविकास आघाडी हे विकास कामावर बोलायला तयार नाही. एका शकुनीमामाकडून सतरंजीवरती चाल खेळून दुसरीकडे लक्ष केंद्रित करण्याचं काम होत आहे. ज्या बाजूला शकुनीमामाचा सुळसुळाट असतो त्याची सेना कौरवाची सेना असते आणि आम्ही पांडवाची सेना आहे.

आम्ही या कौरवांचा नाश करु, असा हल्लाबोलही त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना ते म्हणाले की, एक आजी बाई आली आणि डायलॉगबाजी केली आणि मुख्यमंत्री त्यांना भेटायला गेले. या महाराष्ट्रामध्ये अनेक आजीबाई आहेत. त्यांचे डोळे पुसायला वेळ मिळाला का? असा सवाल त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या
फिट ऍन्ड हॅन्डसम असूनही ‘हे’ अभिनेते नाही बनू शकले हिरो, पण खलनायक बनून कमावले नाव
आलिया भट्ट-रणबीर कपूरचा २००४ मधील ‘तो’ फोटो व्हायरल, ११ वर्षांच्या वयातच दोघांना झाले होते प्रेम
भोंगावादावर गृहमंत्री वळसे पाटील स्पष्टच बोलले; भजनं, किर्तनं, नवरात्री, गणेशोत्सव, यात्रा सगळंच…

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now