Share

“कर्तबगार माणसांच्या घरात पाळणा हालतो, वांझोट्या शिवसेनेला लेकरं कशी होणार?”

sadabhau khot

आगामी पाच राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly elections) होणार आहेत. उत्तर प्रदेशसह पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 10 फेब्रुवारीपासून मतदानाचे टप्पे पार पडणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप – प्रत्यारोपांच्या तोफा गडागाडत आहेत. (sadabhau khot criticizes shiv sena)

‘जनतेच्या मनामध्ये आहे जे केंद्रमध्ये सरकार आहे ते राज्यामध्ये असले पाहिजे, असे म्हणत गोव्यात बीजेपीची सत्ता येणार नाही असं,’ अशी टीका काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली होती. आता राऊत यांच्या या टीकेवर भाजपचे सहयोगी असणारे सदाभाऊ खोत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

याबाबत ते गोव्यात निवडणूक प्रचारादरम्यान बोलत होते. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातील जनता राऊत यांना गांभीर्याने घेत नाही. ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ अशी परिस्थिती आहे. राऊतांना वाईनचा रोज डोस जास्त होत असल्यामुळे त्यांच्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते बोलत असतात त्यामुळे आता गुळाचे वाईन देखील राज्यात सुरू करावी.’

तसेच पुढे बोलताना खोत म्हणाले, ‘शेजारच्या घरात पाळणा हल्लायला लागला की आपल्या हातात दोरी येईल असे यांना वाटतंय, पण असं होत नसतं, कर्तबगार माणसांच्या घरात पाळणा हलत असतो. यांच्याकडे पाळणा कसा हलेल वांझोट्या ना लेकरं बाळ होत नसतात, अशी जहरी टीका खोत यांनी शिवसेनेवर केली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मतदानाच्या दोन दिवस आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लखनऊमध्ये भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. ‘लोक कल्याण संकल्प पत्र’ असा भाजपचा जाहीरनामा असणार आहे.

तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, युपी निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांच्यासह इतर वरिष्ठ नेते उपस्थित असणार आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी गोवा विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. अवघ्या काही दिवसांवर मतदानाची तारीख आली असून भाजप जाहीरनाम्यातून काय आश्वासने देणार याकडे लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
प्रशासनाविरोधात लढताना पूर्ण कुटुंब संपलं, न्यायासाठी विधवा पत्नी पतीच्या चितेशेजारी बसून करतेय आंदोलन
शास्त्रज्ञांनी शोधला पृथ्वीच्या भोवती फिरणारा ट्रोजन लघुग्रह, वाचा त्याच्याबद्दल आश्चर्यकारक गोष्टी
जया बच्चन यांनाही झाला कोरोना; धर्मेंद्रसोबतच्या ‘या’ चित्रपटाचे शूटिंग थांबवले…
बॉयफ्रेंडचा अजब कारनामा! गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये भरून चालला होता घेऊन, पहा व्हिडीओ

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now