Share

“महाविकास आघाडी ही मद्यविक्री विकास आघाडी; मंदिरात पाण्याऐवजी वाईन द्या”

udhav thackeray

राज्य सरकारने वाईन विक्रीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येणार आहे, असा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे ठाकरे सरकारवर विरोधक आक्रमक झाले असून ते सत्ताधारी नेत्यांवर टीका करताना दिसून येत आहे. (sadabhau khot criticize thackeray government)

शेतकऱ्यांच्या नवावर सरकार बेवड्यांचं भलं करत आहे, असा आरोप सातत्याने होतोय. आता या निर्णयावर शेतकरी नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही सडकून टीका केली आहे. मंदिरात पण्याऐवजी वाईन द्या म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत ते माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, ‘“राज्यातील महाविकास आघाडी ही मद्यविक्री विकास आघाडी आहे. शेतकऱ्यांच्या नावावर दुकानदारी खपवण्यासाठी वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला गेला. आता गावातल्या दुधाच्या डेअरी बंद करा आणि वायनरी काढा,” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

दरम्यान, ठाकरे सरकारच्या या निर्णयाला वेगवेगळ्या क्षेत्रांतून विरोध होत आहे. अनेक संघटना ठाकरे सरकारच्या या निर्णयाला विरोध करत आहे. आता नागपूरमधील चिल्लर किराणा व्यापारी संघटनेनेही दुकानातून वाईनची विक्री करण्यास विरोध केला आहे.

सामाजिक हित लक्षात घेता आम्ही आमच्या दुकानातून वाईन विक्री करणार नाही. याबाबतचा निर्णय आम्ही एकमताने घेतला आहे, अशी माहिती नागपूर व्यापारी संघटनेचे सचिव ज्ञानेश्वर रक्षक यांनी दिली आहे. तसेच चिल्लर किराणा व्यापारी संघनेतील सर्व सदस्यांनी याला विरोध केला आहे.

राज्यातील तरुण सध्या रोजगार शोधत आहे. पण त्यांना तुम्ही किराणा दुकान उघडा आणि तिथून वाईन विक्री करा. असा रोजगार उपलब्ध करुन देणे चुकीचे आहे, असे म्हणत ज्ञानेश्वर रक्षक यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघनेचे शहरात सुमारे पाच हजार सदस्य आहे.

किराणा दुकानातून वाईन विक्री केल्यास त्याचे विपरीत परीणाम होतील असे ग्राहकांचे म्हणणे आहे. किराणा दुकानातून वाईन विक्री केल्यास दुकानांमध्ये महिलांना येण्यास अडचणी येऊ शकतात. तसेच लहान मुलांनीही किराणा दुकानात पाठवणे योग्य नसेल. त्यामुळे किराणा दुकानात वाईन विक्री करण्याचा निर्णय योग्य नाही, असे संघटनेने म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
सलमान अफजल तर मी छत्रपती शिवाजी महाराज, कोथळा बाहेर काढेन; बिचुकलेचे वादग्रस्त वक्तव्य
बिचुकलेने सलमानला दिली आता थेट धमकी; म्हणाला, सलमान अफजल खान तर मी..
१ फेब्रुवारीपासून बदलणार बँकिंगचे ‘हे’ महत्वाचे नियम, थेट ग्राहकांच्या खिशावर होणार परिणाम
बापाचा निष्काळजीपणा! लहान मुलाच्या हातात कार देणं पडलं महागात; ४ मजूरांना चिरडलं

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now