अलीकडे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलेलं असतानाच कालचा दिवस एका वेगळ्या गोष्टीसाठी प्रचंड चर्चेत होता. काल उद्योगपती गौतम अदानी यांनी बारामतीला भेट दिली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबाच्या उपस्थितीत वेगवेगळ्या कार्यक्रमांना अदानींनी प्रमुख उपस्थिती लावली.
काल राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमाला उद्योगपती गौतम अदानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळासह राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी एका प्रसंगाने हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला. काल अदानी यांना कार्यक्रम स्थळापर्यंत पोहचवण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं. सोशल मिडियावर हे फोटो तुफान व्हायरल होतं आहेत.
याचाच धागा पकडत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीला जहरी शब्दात लक्ष केलं आहे. रोहित पवार आणि अदानी यांचा गाडीतील फोटो शेअर करत सदाभाऊ खोत यांनी पवार कुटुंबियांवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. खोत यांनी या बद्दल ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
ट्विटमध्ये सदाभाऊ खोत म्हणतात, ”’लुटारू आले की घोड्यावरून यायचे. आता गाड्यांमधून येतात. दोन लुटारू भाई भाई, अवघा देश लुटून खाई..” असे खोचक ट्विट खोत यांनी केले आहे. मात्र खोत यांच्या ट्विटवर अद्याप राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.
दरम्यान, काल बारामतीत या उद्घाटनासाठी आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिले आहेत. पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन कार्यक्रम काल बारामतीत पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
पेन्शन कपात करायची असेल तर लाखो पगार घेणाऱ्या मंत्र्यांची करा, अग्निपथ विरोधात विद्यार्थ्यांचा संताप
आईचं मंगळसुत्र विकून दंड भरायला आला तरूण, RTO ला समजताच उचललं ‘हे’ पाऊल, होतंय कौतुक
‘पाकिस्तानी टिमचा कोच झाल्यावर सांगेन’, जेव्हा रोहितच्या वक्तव्याने सगळे पोट धरून हसले होते