राज्यसभा निवडणुकीच्या तोफा थंडावत नाही तोच विधान परिषदेचे रणमैदान तापले आहे. कोणत्या पक्षाने कोणाला उमेदवारी दिली इथपासून माघार कोणी घेतली इथपर्यंत सर्व अजबच.. त्यावर सर्व पक्षाचे लोक बोलताना दिसत आहेत. सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतून सदाभाऊ खोत यांनी अचानक माघार घेतली. आपला उमेदवारी अर्ज भरलाच नाही. यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले. याबाबत महाराष्ट्राचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केलेले ट्वीट चर्चेचा विषय ठरले आहे. (“Sadabhau is not an MLA. At least give tea and water to the guests )
सदाभाऊ खोत अपक्ष म्हणून विधान परिषदेची निवडणूक लढवणार होते. भाजपने स्वपक्षाच्या ५ लोकांना उमेदवारी दिली.त्यात प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, प्रविण दरेकर,उमा खापरे, राम शिंदे यांचा समावेश आहे. तर ६वा उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत अपक्ष म्हणून भाजपच्या पाठींब्याने उमेदवारी दाखल करणार होते. पण शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
त्यावर सुरज चव्हाण यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांनाच सल्ला दिला आहे. ते म्हणतात, देवेंद्रजी.. सदाभाऊ खोत यांची अवस्था बघवत नाही. त्यांना काहीतरी काम द्या. तुम्ही सदाभाऊ खोत यांना आमदारकी नाही देऊ शकला. अशी खोचक टीका त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केली आहे.
पुढे सुरज चव्हाण म्हणाले की, तुमच्या सागर बंगल्यावर जे पाहुणे येतात त्यांना चहापाणी करण्याचं, पाहुणचाराचं तरी काम सदाभाऊ खोत यांना द्या. ते त्या कामात तरी व्यस्त राहतील. यातून कळते की, भाजप समर्थक बनून देखील काहीच काम नसणाऱ्या बिनकाम्या माणसासारखी सदाभाऊ खोतांची अवस्था झाली आहे.
भाजपने स्वपक्षाच्या एका उमेदवाराला माघार घेण्यास सांगितले असते तर सदाभाऊ खोतांचा मार्ग सुकर झाला असता. परंतु तसे न करता उलट पराभवाच्या भीतीने ६वा उमेदवार देणे भाजपने टाळले. सदाभाऊ खोत त्यामुळे हतबल झाले आणि त्यांनी माघार घेतली. १० जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असणार होते मात्र सदाभाऊ खोतांच्या माघार घेण्यामुळे आता ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचे ५ तर मविआचे ६ अशी उमेदवारांची एकूण संख्या आहे.
या सगळ्यात अपक्ष असणारे कधी किंगमेकर तर कधी बिनकामाचा अडसर ठरताना दिसत आहेत. अपक्ष म्हणून विधानपरिषदेची निवडणूक लढऊ इच्छिणारे सदाभाऊ खोत राजकारणाच्या डावांत मागे पडले आणि त्यांच्या या अवस्थेवर सुरज चव्हाण यांनी खरमरीत टीका केली आहे. मागे याच सुरज चव्हाण यांनी राज ठाकरेंना महाराष्ट्राचे औवेसी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या-
किळसवाणे! पुतिन यांच्यासोबत बॉडीगार्डदेखील जातात वॉशरूमममध्ये, करतात ‘हे’ विचित्र काम
जबरा फॅन! मुस्लिम युवकाने योगींचा थेट छातीवर गोंदवला टॅटू, मु्स्लिम समाज विरोध करत म्हणाला..
जबरदस्त! ‘ब्रह्मास्त्र’च्या ट्रेलरने दिली हॉलिवूडला टक्कर, VFX पाहून चाहतेही झाले थक्क, पहा ट्रेलर