Sachin tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज अचानक नृसिंहवाडीत हजेरी लावली. सोमवारी पहाटे तो श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी पोहोचला होता. सकाळी पाच वाजता तो काकड आरतीला उपस्थित होता. त्याला पाहून भाविकही अवाक झाले.
सचिनचं मंदिरात येण्यमागं कारण होतं. त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळाले यासाठी सचिनने दत्त चरणी साकडे घातले आहे. सचिनने काकड आरतीही केली अन् त्यानंतर दत्ताचे दर्शन घेऊन प्रार्थना केली. पहाटे चार वाजून ४५ मिनिटांनी सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर श्री क्षेत्र नृसिंहवाडीला पोहोचले होते.
येथे कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर दत्त मंदिर आहे. या दत्त मंदिरात दर्शनासाठी दोघेही पोहोचले होते. पहाटेच्या काकड आरतीला सचिनने उपस्थिती लावली. यावेळी जास्त गर्दी नव्हती. नवल खोंबारे यांनी दत्त चरणी प्रार्थना केली आणि प्रसाद म्हणून श्रीफळ त्यांच्या हाती दिले.
यावेळी त्यांच्यासोबत सौरभ भोळेही हजर होते. पहाटेच्या वेळी भाविक कमी होते त्यामुळे सचिनने रांगेत उभे राहून दर्शन घेतले. सचिन आणि त्याचा मुलगा अर्जुन दोघांनीही मास्क घातले होते त्यामुळे भाविकांना त्यांना ओळखता आले नाही. कोल्हापुरातील उद्योजक तेज घाटगे यांचे भाऊ गौरव घाटगे यांनी फोन करून मंदिराच्या ट्रस्टला याबाबत माहिती दिली होती.
त्यांनी सांगितले होते की, त्यांचे जवळचे आणि खास पाहुणे मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत. तेज घाटगे यांच्या मुडशिंगीच्या फार्महाऊसवर रात्री दहाच्या सुमारास सचिन आणि अर्जुन उतरले होते. रात्री त्यांनी तेथेच पाहुणचार केला आणि मुक्काम केल्यानंतर पहाटे लवकर ते मंदिरात जाण्यासाठी निघाले होते.
जेव्हा सचिन आणि अर्जुन तेंडुलकर तेज घाटगे यांच्या घरी गाडीतून उतरले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांना विश्वास बसत नव्हता की स्वता क्रिकेटचा देव आपल्या घरी आला आहे. त्यांनी सचिनचा कोल्हापुरी पाहुणचार केला. सचिनला असं अचानक पाहून अनेकांना विश्वास बसत नव्हता. त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
KL Rahul : ‘सगळ्यात आधी के एल राहूलला टिम इंडीयातून बाहेर हाकला’
Ravichandran Ashwin : अचानकच निवृतीच्या गोष्टी करायला लागला अश्विन; म्हणाला, ‘सर्वांचे खूप खूप आभार, माझी क्रिकेट कारकिर्द…
bachu kadu : एकनाथ शिंदे नव्हे तर ‘या’ नेत्याच्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले; झाला धक्कादायक गौप्यस्फोट
Recipe : आता घरच्या घरी बनवा चमचमीत मटण; फक्त हे दोन मसाले टाकून येईल हॉटेलसारखी चव