Share

Sachin tendulkar : याला म्हणतात साधेपणा! क्रिकेटच्या देवाने टपरीवाल्याचा चहा घेतला अन् त्याची इच्छाही पुर्ण केली

Sachin tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आज पुर्ण जगात क्रिकेटचा देव म्हणून ओळखलं जातं. इतिहासात सुवर्णअक्षरांनी त्याचं नाव नोंदवण्यात येईल यात काही शंका नाही. ९० च्या दशकात अन् नंतरचा काही काळ सचिननं गाजवला. त्यानं अनेक विक्रम केले जे आजपर्यंत कोणालाच मोडता आलेले नाहीत.

जसा सचिन त्याच्या फलंदाजीसाठी ओळखला जातो तसाच सचिन त्याच्या साधेपणासाठीही ओळखला जातो. आज त्याचा साधेपणा बेळगावच्या लोकांना पाहायला मिळाला. २०१३ ला सचिननं निवृत्ती घेतली होती पण अजूनही सचिनचे तेवढेच चाहते आहेत.

तर झालं असं की, सचिन त्याचा मुलगा अर्जुनसोबत गोव्याला निघाला होता. यादरम्यान त्याला चहा पिण्याची इच्छा झाली आणि त्याने बेळगावला एका ठिकाणी गाडी थांबवून चहाचा आस्वाद घेतला. जिथे त्याने चहा पिला त्या टपरीवाल्यासाठी हा आनंदाचा क्षण होता.

तो क्षण तो आयुष्यात कधी विसणार नाही. फौजी चहा असे त्या टपरीचे नाव होते. या चहाच्या टपरीवर सचिनने चहाचा आस्वाद घेतला. चहाच्या टपरीचे मालक पिंटू प्रकाश यांना सुखद धक्काच बसला. सचिन आणि अर्जुनने तेथे चहा पिल्यानंतर १७५ रुपये एवढे बिल झाले होते.

सचिनने २०० रुपये देऊन ते बिल भरले. तसेच २५ रुपये परत न घेता त्या चहावाल्याला टीप दिली. इतकंच नाही तर त्या नोटेवर सचिनने आपला ऑटोग्राफही दिला. यानंतर चहाच्या टपरीचे मालक पिंटू प्रकाश यांच्यासोबत सचिनने सेल्फीही काढला. यावेळी सचिनचा साधेपणा पाहून आजूबाजूचे सगळेच अवाक झाले.

पिंटू प्रकाश  यांचा लहान मुलगाही यावेळी उपस्थित होता. सेल्फी घेताना दोघेही आनंदी दिसत होते. दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला निवृत्ती घेऊन आता तब्बल ९ वर्षे उलटली आहेत पण त्याची क्रेझ थोडीही कमी झालेली नाही. आजही सचिनला पाहण्यासाठी त्याचे चाहते गर्दी करत असतात. त्याला किमान एकदा पाहण्यासाठी, त्याची एक झलक दिसण्यासाठी चाहते जीवाचं रान करतात.

महत्वाच्या बातम्या
Sachin tendulkar : आपल्या मुलाचं टीम इंडियात सिलेक्शन व्हावं म्हणून सचिन तेंडुलकरने ‘या’ देवाला घातलं साकडं
ratan tata : ‘असा’ पाहिजे फॅन..! घरातल्या मिठापासून ते चारचाकीपर्यंत सगळीकडेच TATA; रतन टाटांच्या चाहत्याची देशात चर्चा
Recipe : चिकन मटन बनवताना ‘हे’ दोन मसाले त्यात टाका.! येईल जबरदस्त चव; हाॅटेलची भाजीही पडेल फिकी
Recipe : आता घरच्या घरी बनवा चमचमीत मटण; फक्त हे दोन मसाले टाकून येईल हॉटेलसारखी चव

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now