क्रिकेटचा देव म्हणून ओळख असणारा सचिन तेंडुलकर ४९ वर्षांचा झाला आहे. आज त्याचा वाढदिवस असून अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहे. त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ते विराट कोहली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारख्या दिग्गजांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (sachin tendukar celebrate birthday)
सचिन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याच्या नावावर सर्वाधिक शतकांचा विक्रमही आहे. वयाच्या १६ व्या वर्षी भारतासाठी पहिला सामना खेळणारा सचिन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके झळकावणारा एकमेव फलंदाज आहे.
सचिनच्या ४९ व्या वाढदिवसानिमित्त मुंबई इंडियन्सने त्याला खास भेट देत एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये मुंबईच्या सर्व खेळाडूंनी सचिनला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्याच्यासोबतच्या पहिल्या भेटीचे अनुभवही शेअर केले आहेत.
व्हिडिओच्या शेवटी अर्जुन तेंडुलकरनेही त्याच्या वडिलांना शुभेच्छा दिल्या आहे., मी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. तुमचा दिवस आनंदात जावो, माझ्या आयुष्यात तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद. तसेच व्ही व्ही एस लक्ष्मण, डेवाल्ड ब्रेव्हिस, हरभजन सिंग यांनीही सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी लिहिले, सर्वात आनंदाचा दिवस, जेव्हा तुमच्यासारखा महान आणि कर्तृत्ववान व्यक्ती या पृथ्वीवर आला. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांपेक्षा अधिक साध्य कराल. तुम्ही नेहमी निरोगी राहावे हीच प्रार्थना.
तसेच दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने लिहिले, वाढदिवसाच्या शुभेच्छा सचिन सर, तुम्ही माझ्यासाठी एक प्रेरणा आहात.तसेच भारताचा महान ऑफस्पिनर हरभजन सिंगने ट्विट केले की, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाजी, तुमचा दिवस छान जावो. बायो बबलमधून बाहेर पडल्यावर, आम्ही पुन्हा सेलिब्रेट करू.
https://www.facebook.com/100044226919512/posts/566324638185095/?d=n
त्यानंतर आता सचिन तेंडूलकरने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहे. यावेळी त्याने दोन फोटो शेअर केले आहे. त्यामध्ये एका फोटोत त्याची मुलगी सारा तेंडुलकर दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये तो त्याच्या दोन पाळीव श्वानांबरोबर दिसत आहे.
माझ्या वाढदिवसासाठी माझ्या खास लोकांना आणले आहे. तसेच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार, असे कॅप्शन सचिन तेंडुलकरने त्याच्या फोटोला दिले आहे. सध्या त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्याच्यावर प्रतिक्रिया देतांनाही अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या संघात मराठमोळा गोलंदाज एंट्री घेत असतानाच उडाला गोंधळ, खेळाडूने ‘ते’ ट्विट केले डिलीट
‘RRR’ आणि ‘KGF 2’ च्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘यात चित्रपट कुठंय?’
एकेकाळी स्टुडिओमध्ये उलटी साफ करायची ‘ही’ अभिनेत्री, आता KGF मध्ये साकारली महत्वाची भूमिका