राजकीय वातावरण तापलेलं असतानाच एमआयएम पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यामुळे निर्माण झालेला वाद आता वाढला आहे. आता या प्रकरणात काँग्रेसनेही उडी घेतली आहे. यापूर्वी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याबद्दल कॉंग्रेसने भाजप नेत्यांवर हल्लाबोल चढवला आहे.
एआयएमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यापासून राजकरण तापलं आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला फुले अर्पण केल्याच्या घडामोडींवर विरोधी पक्ष भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि खासदार-आमदार राणा दाम्पत्याने टीका केली आहे.
त्याचबरोबर आता काँग्रेसनेही या वादात उडी घेतली असून यापूर्वी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आता याच प्रकरणावर कॉंग्रेसचे नेत सचिन सावंत य़ांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सावंत यांनी ट्विट करत थेट पुरावे साजरे केले आहे.
तसेच भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या व प्रवक्त्या, जम्मू काश्मीर वक्फ बोर्डाच्या अध्यक्षा डॉ.दाराकशान अन्दराबी यांनी कोरोना काळात औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती.
फडणवीस जी मुख्यमंत्री असताना २०१९ ला असदुद्दीन ओवेसी कबरीवर गेले होते. मग मविआ सरकारविरोधातच बोंब का? pic.twitter.com/atvT2Fulje— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 16, 2022
फोटो शेअर करत सचिन सामंत यांनी म्हंटलं आहे की, ‘औरंगजेबाची कबर ही भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. मोदी सरकार प्रवेश नियंत्रित करु शकते, वा बंदीही घालू शकते, मोदी सरकार ओवैसीविरोधात तक्रार का नोंदवत नाही? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, सावंत यांनी ट्विटमध्ये एक व्हिडिओ पोस्ट करत म्हंटलं आहे की, ‘ज्यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या व प्रवक्त्या, जम्मू काश्मीर वक्फ बोर्डाच्या अध्यक्षा डॉ. दाराकशान अन्दराबी यांनी कोरोना काळात औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती, असे म्हटले आहे.
‘फडणवीसजी मुख्यमंत्री असताना २०१९ ला असदुद्दीन ओवेसी कबरीवर गेले होते. मग मविआ सरकारविरोधातच बोंब का? असा संतप्त सवाल सचिन सामंत यांनी उपस्थित आहे. यामुळे आता हे प्रकरण चांगलच चिघळल आहे. यावर अद्याप भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेली नाहीये.
महत्वाच्या बातम्या-
फडणवीसांवर टिका करताना दिपाली सय्यदची जीभ घसरली; म्हणाली, टरबुज्या, भोंग्या….
अखेर ताजमहालच्या तळघरातील २२ बंद खोल्यांचे फोटो जारी, ASI ने २०२२ मध्ये ‘या’ कारणास्तव उघडले लॉक
हनुमानाबद्दल प्रश्न विचारताच नवनीत राणांची झाली पंचाईत, VIDEO तुफान व्हायरल