Share

खोटा कळवळा दाखवणाऱ्या भाजप नेत्यांना मराठा आंदोलनात जाताना लाज कशी वाटत नाही?

congress bjp flag

’15 दिवसांत मराठा आरक्षणााचा प्रश्न मार्गी लावतो अस सरकारने सांगितले होते. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे खासदार संभाजी छत्रपती (sambhajiraje) यांनी म्हंटले आहे. तसेच संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाच्या उन्नतीसाठीच्या सात मागण्या मंजूर व्हाव्यात म्हणून शनिवारपासून उपोषण सुरू केलं आहे.

कालच्या दिवसभरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. तसेच राज्यातील विविध संघटनांनी देखील संभाजीराजेंना पाठिंबा दर्शवला आहे. मुंबईच्या आझाद मैदानावरील छत्रपती संभाजीराजांच्या अमरण उपोषणाला शेकडो मराठा तरुणांनी पाठिंबा दर्शविला आहे.

तसेच अनेक नेत्यांनी उपोषणस्थळी हजेरी लावली, तसेच संभाजीराजे यांची भेट घेतली. भाजपचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आझाद मैदानावर येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. याचाच धागा पकडत कॉंग्रेसने हल्लाबोल चढवला आहे.

कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी याबाबत ट्विट करत भाजपावर शाब्दिक निशाणा साधला आहे. ते म्हणतात, ‘भाजप नेत्यांना मराठा आंदोलनात जाताना लाज कशी वाटत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात जाणारी ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ संस्था भाजपचीच!, असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

ट्विटमध्ये सावंत म्हणतात, खासदार संभाजी छत्रपती यांना संसदेत बोलण्यासाठी आर्जवे करताना साथ मविआने दिली पण परवानगी नाकारणारी भाजपच! आता मराठ्यांसाठी खोटा कळवळा भाजपचाच!, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. तर त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवसेना खासदार धैर्यशील माने त्या ठिकाणी पोहोचले आहेत. ‘आपला राजा उपाशी बसला असताना आपण घरी कसे बसायचे,’ असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

तसेच ‘मी इथं छत्रपतींचा मावळा म्हणून आलोय. दिल्लीमध्ये आम्ही राजेंच्या सोबत लढतोय. आज मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राजघराण्याला उपोषणासाठी बसावं लागतंय हा माझ्या आयुष्यातील काळा दिवस आहे,’ अशी खंत धैर्यशील माने यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मी संभाजीराजेंचा हा संघर्ष जवळून पाहिला आहे. राजेचं ज्यावेळचं मुंबईला आंदोलन झालं त्यावेळी राजे सर्वत्र चालत जात होते. मी त्यावेळी खासदार नव्हतो. त्यावेळी संभाजी छत्रपतींच्या एका शब्दावर मराठा समाज बांधव एकत्र आले आणि महाराष्ट्र शांत राहिला, ही परिस्थिती होती, असं धैर्यशील माने यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या
रात्रीचं जेवण केलं अन् मृत्यूच्या दाढेत अडकलं कुटुंब; विषबाधेमुळे आई अन् तीन मुलांचा मृत्यू
युक्रेनच्या राष्ट्रपतींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; काय झालं नेमकं संभाषण वाचा सविस्तर….
लवासा प्रकरणी पवार कुटुंबीयांविरोधातील आरोपांमध्ये तथ्य; उच्च न्यायालयाच्या निर्णयाने पवार अडचणीत
संभाजीराजेंना उपोषण करावं लागलं हा माझा आयुष्यातील काळा दिवस; खासदार धैर्यशील माने यांनी बोलून दाखवली खंत

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now