द काश्मीर फाइल्स या चित्रपटाने लोकांची मने हेलावली आहेत. लोक हा चित्रपट फक्त मनोरंजन म्हणून नाही, तर भावनिकदृष्ट्याही पाहत आहेत. रात्री उशिरापर्यंत चित्रपटगृहे तुडुंब भरलेली असून चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्यांचे डोळे पाणावलेले दिसून येतात. (s y kuresh on kashmir files)
या चित्रपटाबाबत प्रत्येकजण वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहे. आता माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांनीही या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरमध्ये पंडितांच्या बाबतीत जे काही घडले त्यासाठी मुस्लिमांना दोष देणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
काश्मिरी पंडितांवरील हिंसाचार मुस्लिमांनी नाही तर दहशतवाद्यांनी केला आहे, असे कुरेशी यांनी म्हटले आहे. भोपाळमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या कुरेशी यांनी लव्ह जिहाद हा मुद्दा नसल्याचे सांगितले. हे जाणूनबुजून तयार केले जात असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे.
त्यानंतर एका वृत्तवाहिनीशी विशेष संवाद साधताना कुरेशी यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादावर थेट काहीही बोलण्यास नकार दिला. मला कोणत्याही वादात पडायचे नाही, हा चित्रपट पाहिलाही नाही, मात्र मुस्लिमांचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.
काश्मीरमध्ये दहशतवाद ही गंभीर समस्या आहे. काश्मिरी पंडितांवर दहशतवाद्यांनी अत्याचार केले आहे. यासाठी मुस्लिमांना दोष देणे योग्य नाही.लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकरणांबाबत कुरेशी म्हणाले की, प्रेम हे फक्त प्रेम असते, त्यात जिहादला स्थान नाही.
तसेच कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये प्रेम कुठेही आणि कधीही होऊ शकते. यात धर्माची चर्चा निरर्थक आहे. केवळ मुस्लिम मुले आणि हिंदू मुलींमध्येच प्रेम असते असेही नाही. हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी यांच्यातही प्रेम होऊ शकते, असे कुरेशी यांनी म्हटले आहे.
हिजाबबाबत सुरू असलेल्या वादावर कुरेशी म्हणाले की, कॉलेजमध्ये गणवेश नाही, मग हिजाबवर बंदी घालण्याची काय गरज आहे. गणवेश शाळांमध्ये आहेत. शाळेत शीख पगडीवर कोणतेही बंधन नाही. हिंदू महिलांना सिंदूर घालण्याची परवानगी असेल, तर हिजाबचा वाद अनावश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या-
सततच्या लोड शेडिंगमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी उचलले मोठे पाऊल, तेलंगणात खरेदी केल्या जमिनी
काँग्रेस आमदार सरकारला म्हणाला, मला नको तुमचं घर; जितेंद्र आव्हाडांनी दिले सणसणीत उत्तर, म्हणाले..
नितीन गडकरी यांची पुण्यासाठी मोठी घोषणा; प्रवास होणार सुसाट, गडकरींनी सांगितला मास्टर प्लॅन