Share

तुमचे एक पाऊल आणि १०० वर्षे मागे जाणार देश; रशियाच्या सर्वात श्रीमंत उद्योगपतीचा पुतीन यांना इशारा

युक्रेनवरील हल्ल्यानंतर अनेक कंपन्यांनी एकतर रशिया सोडली आहे किंवा सोडण्याची घोषणा केली आहे. तसेच त्या कंपन्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जात आहेत. याबद्दल, रशियाच्या सर्वात श्रीमंत उद्योगपतीने पुतीन यांना इशारा दिला आहे की अशा प्रकारच्या हालचालींमुळे देश १०० वर्षांहून अधिक वर्षे मागे जाईल. (russian business man warning)

सीएनएनने दिलेल्या वृत्तातून ही माहिती समोर आली आहे. रशियाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती व्लादिमीर पोटॅनिन जे की मेटल जायंट नोरिल्स्क निकेल (NILSY) चे अध्यक्ष आणि त्याचे सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत. त्यांनी चेतावणी दिली की जर रशियाने पाश्चात्य कंपन्या आणि गुंतवणूकदारांसाठी आपले दरवाजे बंद केले तर रशिया १९१७ च्या क्रांतीच्या कठीण दिवसांकडे परत जाण्याचा धोका आहे.

नोरिल्स्क निकेलच्या टेलिग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे, त्यामध्ये असे म्हटले आहे की, सर्वप्रथम, हे आपल्याला १९१७ मागे म्हणजेच जवळपास १०० वर्षे मागे घेऊन जाईल आणि अशा गोष्टींचे परिणाम आपल्याला अनेक दशके भोगावे लागतील. दुसरे म्हणजे, रशियातील कामकाज स्थगित करण्याचा अनेक कंपन्यांचा निर्णय काहीसा भावनिक आहे आणि त्यांनी तो निर्णय दुसऱ्या देशातील लोकांमुळे घेतला आहे.

रशियाच्या हल्ल्याला आणि युक्रेनवरील निर्बंधांना प्रतिसाद म्हणून अनेक अमेरिकन, युरोपियन आणि जपानी कंपन्यांनी गेल्या दोन आठवड्यांत रशियामधील संयुक्त उपक्रम, कारखाने, दुकाने, कार्यालये आणि इतर मालमत्ता सोडल्या आहेत. गोल्डमन सॅक्स आणि जेपी मॉर्गन यांनीही रशिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारची घोषणा करणाऱ्या या दोन पहिल्या मोठ्या पाश्चात्य बँका आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी सांगितले की त्यांनी रशिया सोडून परदेशी कंपन्यांचे बाह्य व्यवस्थापन सुरू करण्याच्या योजनांना समर्थन दिले आहे. यासंदर्भात क्रेमलिन आणि राज्य माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आली आहे.

त्या व्हिडिओमध्ये पुतिन यांनी म्हटले आहे की, आम्हाला त्यांचे उत्पादन थांबवणाऱ्या कंपन्यांवर निर्णायक कारवाई करणे आवश्यक आहे. बाह्य व्यवस्थापनाची ओळख करून देणे आवश्यक आहे आणि नंतर हे उपक्रम ज्यांना काम करायचे आहे, त्यांच्याकडे हस्तांतरित केले जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
काश्मिरी पंडितांवर बनलेल्या चित्रपटावर ‘आप’च्या माजी नेत्याने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, हा चित्रपट तोच बघेल…
आयुष्यात ऐश्वर्या येताच, सलमानने दिला होता गर्लफ्रेंडला धोका; म्हणाली, “सलमानने मला धर्म…”
झुंड पाहून सुबोध भावेने दिली हैराण करणारी प्रतिक्रिया; म्हणाला, “नागराज तु आमच्या पिढीचा…”

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय

Join WhatsApp

Join Now