Share

धक्कादायक! रशियाने जाहीर केली शत्रू देशांची लिस्ट, युक्रेनसह ‘या’ ३१ देशांचा आहे समावेश

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच आहे. असे असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या शत्रू देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अमेरिका, ब्रिटन आणि युक्रेनसह ३१ देशांचा समावेश आहे. चीनच्या सरकारी मीडियाने याबाबात दावा केला आहे. (russia unfriendly countries list)

रशियन सरकारने शत्रू देशांच्या यादीला मान्यता दिल्याचा दावा चीनच्या CGTN ने आपल्या अहवालात केला आहे. या यादीत अमेरिका, ब्रिटन, युक्रेन, जपान आणि युरोपियन युनियनमधल्या २७ देशांचा समावेश आहे. चीनच्या या दाव्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

युक्रेनवर हल्ला केल्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेसह पाश्चात्य देशांच्या निशाण्यावर आहेत. अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी अर्थव्यवस्थेला धक्का देण्याच्या उद्देशाने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यानंतर आता ज्या देशांसोबत आपले संबंध खराब होत आहे, अशा देशांची यादी रशियाने जाहीर केली आहे.

१. अमेरिका: अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. याशिवाय रशियाच्या ४ बँका आणि राज्य ऊर्जा कंपनी गॅझप्रॉमवरही बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेने रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्दही बंद केली आहे. यासोबतच अमेरिकेने युक्रेनला शस्त्रे पाठवली असून आर्थिक मदत देण्याची घोषणाही केली आहे.

२. ब्रिटन: रशियाच्या सरकारी मालकीची एअरलाइन एरोलॉफ्टसाठी ब्रिटनने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. ब्रिटनने ५ रशियन बँकांवर बंदी घातली आहे. यासोबतच पुतिन यांची संपत्ती जप्त करून त्यांची खाती फ्रिज करण्याचेही सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर रशियाच्या अब्जाधीशांनीही खासगी जेट विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. अमेरिकेप्रमाणेच ब्रिटननेही युक्रेनला लष्करी आणि आर्थिक मदत पाठवली आहे.

३. युक्रेन: रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी तर युक्रेनला वेगळा देश मानत नाही, असेही म्हटले आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाने आपले ५०० सैनिक गमावल्याचे मान्य केले आहे. हे युद्ध अजूनही सुरुच असून यामघ्ये युक्रेनच्या अनेक नागरिकांचा जीव गेला आहे.

४. जपान: रशियाविरुद्ध लढण्यासाठी जपान युक्रेनला शस्त्र पुरवत आहे. बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेटसह अनेक संरक्षण उपकरणे जपानने युक्रेनला पाठवली आहेत. मुख्य कॅबिनेट सचिव हिरोकाझू मात्सुनो यांनी सांगितले की ते बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट, तंबू, जनरेटर, फूड पॅकेट, हिवाळी कपडे आणि औषधे युक्रेनला पाठवत आहेत. याशिवाय जपानने ४ रशियन बँकांची मालमत्ता जप्त करण्याची घोषणा केली आहे.

५. युरोपियन युनियन: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याबद्दल युरोपियन युनियनने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. युरोपियन युनियनमध्ये २७ देश आहेत. युरोपियन युनियनच्या सर्व सदस्यांनी त्यांची हवाई हद्द रशियन विमानांसाठी बंद केली आहे. याशिवाय युरोपियन युनियनमध्ये उपस्थित असलेल्या रशियन अब्जाधीशांच्या मालमत्ताही जप्त केल्या जात आहेत. एवढेच नाही तर युरोपियन युनियनमध्ये समाविष्ट असलेले सर्व देश युक्रेनला केवळ आर्थिकच नव्हे तर लष्करीही मदत करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
गोव्यात भाजप काँग्रेसमध्ये जोरदार सामना; पहा कुणाला किती जागा मिळणार
भाजपच्या अंगातील माज अजून गेला नाही, त्यांची जिरवण्याची गरज आहे – धनंजय मुंडे
शिवसेनेच २५ आमदार नाराज; ‘या’ कारणावरून आपल्याच सरकारविरोधात थोपटले दंड

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now