Share

युद्ध सुरू! रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा; बाकी देशांनाही दिला ‘हा’ गंभीर इशारा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir putin) यांना त्यांच्या देशाबाहेर लष्करी शक्ती वापरण्याचा अधिकार दिल्यानंतर मॉस्कोनं युक्रेनमधील आपल्या दूतावासाचा परिसर रिकामा केला आणि राजनैतिक कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं. युक्रेनसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युद्धाची घोषणा केली आहे.

समाजमाध्यमांतून युक्रेनमध्ये शिरत असलेल्या रशियाच्या रणगाड्यांच्या व्हायरल होत असलेल्या द‍ृश्यांनी आणि युक्रेनमध्ये झालेल्या काही हल्ल्यांच्या स्फोटाच्या आवाजाने युक्रेनियन रहिवाशांना धडकी भरली आहे. दरम्यान युक्रेननं बुधवारी (ता.23 फेब्रुवारी) देशव्यापी 30 दिवसांसाठी आणीबाणी घोषित केली आहे. गरज भासल्यास आणखी 30 दिवसांची वाढ केली जाईल.

पूर्व युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होईल, अशी भीती वर्तविली जात आहे. युक्रेनमध्ये सध्या जवजवळ 2 लाख सैन्याची फौज आहे. रशिया युक्रेनला तीन बाजूने सहज घेरू शकते किंवा बेलारूसच्या सीमेपासून युक्रेनची राजधानी काही किलोमीटर अंतरावर आहे. रशिया येथूनच कीववर हल्ला करेल, असंही म्हटलं जातंय.

युक्रेनकडूनही मजबूत तटबंदी करण्यात आली आहे. 451 किलोमीटर लांबीच्या संपर्क रेषेवर भूसुरुंग पेरण्यात आल्याची माहीती आहे. रशियाचं सैन्य सीमारेषेजवळ येत असल्याने तसंच परिस्थिती आणखी चिघळत असल्याने हजारो युक्रेनियन रहिवासी देशाच्या पश्‍चिम भागाकडे निघाले आहेत.

सध्या डोनेट्स्क, लुहान्स्कचा एक तृतीयांश भाग रशिया समर्थक बंडखोरांच्या ताब्यात तर उर्वरित भाग युक्रेनच्याच नियंत्रणाखाली आहे. आता रशियाच्या फौजा या भागांतही घुसणार म्हटल्यावर मोठा संघर्ष होईल, असे मानले जात आहे

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला इशारा देताना शरणागती पत्करण्यास सांगितले आहे. युक्रेनवर रशिया करत असलेल्या कारवाई कोणत्याही देशाने हस्तक्षेप त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असाही इशारा पुतीन यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या
हिजाब वाद: अभिनेत्याने न्यायाधिशांवरच उपस्थित केले प्रश्न, बोलला असं काही की पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नवाब मालिकांना अटक झाल्यानंतर तलवार काढून केला जल्लोष, मोहित कंबोज यांच्यावर पोलिसांनी केली कारवाई
सासरच्यांसाठी खुप भाग्यवान असतात ‘या’ जन्मतारखेच्या मुली, तुमची जन्मतारिख यामध्ये तर नाही ना?
stock in news: ‘या’ शेअर्सच्या बातम्यांवर ठेवा नजर, देतील बक्कळ परतावा, वाचा संपुर्ण यादी

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now