रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे रहस्यांनी भरलेले आयुष्य जगतात. त्याचे वैयक्तिक आयुष्य, आरोग्य आणि रणनीती याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. अशात ब्रिटनची गुप्तचर संस्था एमआय १६ च्या प्रमुखांनी पुतिन यांच्याबाबत धक्कादायक दावा केला आहे. एका अहवालात, अधिका-यांनी सांगितले की पुतिन यांचा मृत्यु झाला असून त्यांच्या जागी त्यांच्यासारखा दुसरा व्यक्ती रशियावर राज करत आहे. (russia president putin is dead)
ब्रिटीश गुप्तचर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पुतिन यांच्या साथीदारांना त्यांच्या मृत्यूचे रहस्य जगापासून अनेक आठवडे किंवा महिने लपवावे लागेल. डेलीस्टारने दिलेल्या वृत्तानुसार, एका गुप्तचर स्रोताने सांगितले की, त्यांची आता दाखवण्यात येत असलेल्या सर्व गोष्टी पूर्व रेकॉर्ड केलेल्या असू शकतात. पुतिन यांचा मृत्यु झाला असून त्यांच्यासारखा दिसणारा व्यक्ती रशियाची सत्ता सांभाळत आहे.
तसेच पुतिन अत्यंत आजारी आहेत आणि जर त्यांचा मृत्यू झाला तर ते अनेक आठवडे किंवा महिने गुप्त ठेवले जाईल किंवा ते आधीच मरण पावले असण्याचीही शक्यता आहे. सध्या याचा तपास करणे अशक्य आहे, असेही गुप्तचरांनी म्हटले आहे. असे मानले जाते की पुतिन जेव्हा आजारी होते तेव्हा त्यांनी त्यांच्या दिसण्यासारख्या व्यक्तीला वापरले होते.
पुतिन यांच्या साथीदारांना सर्वात मोठी भीती ही आहे की पुतिनच्या मृत्यूची बातमी बाहेर येताच रशियामध्ये सत्तापालट होऊ शकते आणि तसेच रशियन जर्नल युक्रेनमधून सैन्य मागे घेऊ शकतात. पुतिन यांच्या मृत्यूमुळे ते कमकुवत आणि सत्तेतून बेदखल होतील. त्यामुळे पुतिन यांना जिवंत सांगणे त्यांच्या हिताचे आहे.
तसेच दोन आठवड्यांपूर्वी, एक रशियन अब्जाधीश व्यापारी आणि क्रेमलिनच्या विश्वासपात्राने दावा केला होता की पुतिन ब्लड कॅन्सरने ग्रस्त आहेत. ते अत्यंत आजारी आहेत. एवढेच नाही तर युक्रेन हल्ल्यापूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.
असे असताना आता एमआय १६ चे एजंट म्हणत आहे की पुतिनची बिघडत चाललेली तब्येत सत्तेवरची पकड गमावत आहे. ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेचे माजी गुप्तहेर ख्रिस्तोफर स्टील यांनी असा दावा केला आहे की पुतिन त्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे सत्तेवरची पकड गमावत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
”तुमचे हे धंदे बंद करा”, भर कार्यक्रमात शिवसेना खासदाराने रोहित पवारांना ठणकावून सांगितलं
मुंबईत आले तर चप्पलांचा हार घालू; बृजभूषण सिंहांविरोधात आता उत्तर भारतीयच झाले आक्रमक
२६ दिवस जेलमध्ये राहणाऱ्या आर्यनला ड्रग्ज प्रकरणातून मिळाली क्लीन चिट; आता नुकसान भरपाई सुद्धा मिळणार