युक्रेनच्या एनरहोदर शहरात असलेल्या युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अहवालानुसार, शुक्रवारी रशियन बॉम्बफेकीमुळे प्लांटला अचानक आग लागली. प्लांटमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवण्यास परवानगी नव्हती, अशात हा हल्ला झाल्यामुळे संपुर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. (russia attack on nuclear plant)
रिपोर्टनुसार, काही वेळाने प्लांटमध्ये अनेक स्फोट झाले. आग लागल्यानंतर काही रशियन सैनिकांनी प्लांटमध्ये प्रवेश केल्याचेही काही अहवाल सांगण्यात येत आहेत. तसेच अणुऊर्जा प्रकल्पाचे प्रमुख इगोर मुराशोव्ह म्हणतात की, अण्वस्त्रांचे संरक्षण खंडित झाले आहे. आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत, पण आग अजूनही सुरूच आहे. अग्निशमन दलाला येऊ दिले जात नाहीये. आम्ही अथक प्रयत्न करत आहोत, अणुभट्ट्या सध्या धोक्यात आहेत.
या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली. झेलेन्स्की म्हणाले की, रशियाला झापोरिझ्झ्या न्यूक्लियर पॉवर प्लांटवर बॉम्बफेक करून चेरनोबिल आपत्तीची पुनरावृत्ती करायची आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी एनरहोदर शहरावर कब्जा केल्याचा दावा केला आहे. यानंतर शुक्रवारी त्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात प्लांटला आग लागली. तसेच हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या रेडिएशनमुळे कोट्यवधी लोकांचे जीवही धोक्यात आले आहे. सध्या अणुभट्ट्या बंद केल्या जात आहेत.
एनरहोदरचे स्थानिक नेते दिमित्रो ऑर्लोव्ह म्हणतात की, या आगीत प्लांटमधील काही लोक जखमी झाले आहेत. मात्र, काही वेळाने गोळीबार थांबला. तर झापोरिझ्झ्या प्रशासनाचे म्हणणे आहे की, परिस्थिती अजूनही कठीण आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
या प्लांटचे अधिकारी आंद्रे तुझ यांनी युक्रेनियन टीव्हीला सांगितले की, ‘अणुभट्टीचे सध्या नूतनीकरण सुरू होते, त्यामुळे तिथे सध्या काम सुरु नाही, परंतु प्लांटमध्ये अणुइंधन आहे. तर युक्रेनचे परराष्ट्र मंत्री कुलेबा यांनी रशियन सैन्याला आगीनंतर झापोरिझ्झ्या प्रदेशातील युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ला मागे घेण्याचे आवाहन केले.
महत्वाच्या बातम्या-
शाहरूखचा बहुचर्चित पठाण ‘या’ दिवशी होणार रिलीज, टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
त्याला मी रंगेहाथ पकडले होते तरी मी..; दीपिकाने सांगितला बॉयफ्रेंड रणबीरचा ‘तो’ किस्सा
‘इंडियाज गॉट टॅलेंट’ मधील ‘या’ दोन स्पर्धकांचे नशीब फळफळले, रोहित शेट्टीने दिली चित्रपटात काम करण्याची संधी