राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच मनसेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना कोणते पद मिळणार अशी चर्चा होती, अशात राष्ट्रवादीने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. (rupali patil vice president of pune)
रुपाली ठोंबरे पाटील यांची पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहे. रुपाली पाटील यांची नुकतीच महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यावेळीही त्यांचे नाव चांगलेच चर्चेत आले होते.
रुपाली पाटील या नेहमीच आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या गेल्या आहेत. आधी त्या मनसेत होत्या, त्यानंतर त्यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. राष्ट्रवादीतही त्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जात आहे. आजच पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्यानंतर रुपाली पाटील यांना लगेचच ही जबाबदारी मिळाली आहे.
रुपाली पाटील यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी देऊन निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. रुपाली पाटलांच्या नावाने राष्ट्रवादीला पुण्यात आता एक आक्रमक चेहरा पाहायला मिळाला आहे. पुणे शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या सहीने रुपाली पाटील यांना निवडीचे हे पत्र देण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार रुपाली पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाची विचारधारा आणि तत्वांना केंद्रस्थानी ठेऊन पक्षाच्या विचारार्थ आणि संघटन वाढवण्यासाठी आपण यशस्वी वाटचाल कराल व आपल्या सक्षम कृतीतून जनसामन्यांच्या मनात आपल्या पक्षाची प्रतिमा उत्तरोत्तर अधिक उज्वल कराल, अशा शुभेच्छा रुपाली पाटील यांना देण्यात आल्या आहे.
राष्ट्रवादीत येण्यापूर्वी रुपाली पाटील यांना मनसेच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. मनसेच्या पुणे शहर महिला आघाडी अध्यक्ष म्हणून त्या कार्यरत होत्या. तरुण-तरुणी आणि महिलांच्या प्रश्नावर त्यांनी अधिक भर दिला होता. पुणे मनपात त्या मनसेच्या नगरसेविकाही होत्या.
महत्वाच्या बातम्या-
मी गे नाही, त्यामुळे मी कोणत्याही मुलीसोबत झोपेन…; शाहरुख खानने केला होता मोठा खुलासा
भरदिवसा पोलिस आयुक्तालयाजवळ महिलेवर बलात्कार, पिंपरी-चिंचवडच्या घटनेमुळे उडाली खळबळ
‘काळजी घ्या, लाचार राऊतांना आवरा’, २५ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार म्हणणाऱ्या राऊतांना मनसेचे उत्तर