सोमवारी दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर आज त्याला मुंबईच्या धारावी पोलिसांनी अटक केली आहे. (rupali patil thombre aggressive against hindustani bhau)
यावरून आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमद्धे आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. याच प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. “भडखाऊ भाईजान” ला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे, असे म्हणत रूपाली पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ट्विट करत रूपाली पाटील म्हणतात, ‘“प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांना भडकवून त्यांच्या जीवाशी खेळणारा “भडखाऊ भाईजान” ला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे, त्याच्यावर तात्काळ कारवाई करून त्याची मस्ती जिरवावी”, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्वीट करत केली आहे.
प्रसिद्धीसाठी 'विद्यार्थ्यांना भडकवून त्यांच्या जीवाशी खेळणारा "भडखाऊ भाईजान" कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे
तात्काळ कारवाई करून त्याची मस्ती जिरवावी …@Dwalsepatil @AjitPawarSpeaks— Rupali patil thombare (@Rupalispeak) January 31, 2022
तर दुसरीकडे भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हिंदुस्थानी भाऊची सुटका झाली पाहिजे, आम्ही सगळे त्याच्या सोबत आहोत. जर त्यांची सुटका नाही झाली तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा माजी पदाधिकारी मोहित कंबोज यांनी राज्य सरकारला दिला आहे.
व्हिडिओ ट्विट करत कंबोज यांनी म्हंटले आहे की, ‘मला असं वाटतं विद्यार्थी हे भविष्य आहेत आणि त्यांच्यासोबत काही अन्याय होत असेल, त्यांचा आवाज कोणी सरकारसमोर मांडत असेल तर त्याच्यावर कारवाई होणं चुकीचं आहे. ज्या प्रकारे गुन्हा दाखल करुन हिंदुस्थानी भाऊला अटक करण्यात आली, हे निंदनीय कार्य महाराष्ट्र सरकारनं केलं आहे.’
पुढे ते म्हणतात, ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत: या घटनेची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर हिंदुस्थानी भाऊला सोडलं पाहिजे. विद्यार्थी आपल्या देशाचं भविष्य आहेत. त्यांच्यासोबत कोणता अन्याय झाला किंवा आंदोलन करणं, मोर्चा काढणं हा जर राज्यात गुन्हा ठरत असेल तर देशात, राज्यात सरकार असहिष्णू झालंय यापेक्षा मोठी कोणतीही बाब असू शकत नाही.’
दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडकवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
हिंदुस्थानी भाऊला सोडा, अन्यथा आंदोलन करु; ठाकरे सरकरविरोधात भाजपाने थोपटले दंड
कन्हैया कुमारवर काँग्रेसच्या कार्यालयात घुसून शाईफेक; शाई फेकणाऱ्याला पकडून केली मारहाण
अक्षय कुमारने अफेअरच्या बहाण्याने रवीनाचा केला होता वापर; म्हणाली, एक नाही तर तीन-तीन वेळा..
पतीने आपल्या कुटुंबीयांसह पत्नीच्या कुटुंबीयांनाही झोपेत जिवंत जाळलं, कारण वाचून धक्का बसेल