शरद पवारांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला होता त्यानंतर भाजप नेते नारायण राणेंनी शरद पवारांना धमकी दिली होती. ते म्हणाले होते की, संजय राऊत तुमचे किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा. आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत.
काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केलेली आहे. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही. त्यानंतर आता रुपाली पाटील नारायण राणेंवर संतापल्या आहेत. त्यांनी राणेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. नारायण राणे यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्याने शरद पवार साहेबांना पोकळ धमक्या देऊ नये.
तुम्ही आम्हाला घर गाठणं कठीण करताय की आम्ही तुमचं घराबाहेर पडणं बंद करतो हे बघा. नारायण राणेंनी शरद पवारांना धमकी दिली त्याला कोणी गांभीर्याने घेत नाही. बंडखोरांची मदत करायला आलेले नारायण राणे हे तुम्ही रचलेलं कुभांड आहे. तुमच्यावर ईडीची कारवाई होऊ नये, म्हणून तुम्ही स्वत: भाजपामध्ये गेलात आणि आता धुतळ्या तांदळासारखे असल्याप्रमाणे बोलताय.
ज्या सत्तापिपासू लोकांना ही सत्ता मिळवायची आहे, मी पुन्हा येईन चे झटके त्यांना येतात. त्यांनी महाराष्ट्रात हे रचून आणलंय, असा आरोप रुपाली पाटील यांनी केला. आम्ही आमच्या आमदारांशी काय बोलायचं हा आमचा प्रश्न आहे. यात बेडकासारखे आलात कुठून, त्या बेडकाने कडेकडेने निघायचं.
गल्लीगल्लीत असलेल्या गुंडांचा कसा बंदोबस्त करायचा हे महाविकास आघाडीला चागलं माहिती आहे. परिस्थिती गंभीर असली तरी सरकार आणि शरद पवार खंबीर आहेत. त्यामुळे राणेंसारख्या केंद्रिय मंत्र्याने त्यांना पोकळ धमक्या देऊ नयेत. आम्ही तुमचं घराबाहेर येणं बंद करतोय हे पाहा.
पुढे त्या म्हणाल्या की, तुमच्यासारखे गुंड भरपूर आहेत पण शरद पवार एकच आहेत. जगातील वरिष्ठ नेते आणि तुमच्या सगळ्यांचा बाप आहेत, असं म्हणत त्यांनी नारायण राणेंचा समाचार घेतला आहे. दरम्यान, सध्या शिवसैनिक बंडखोर आमदारांच्या विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.
महत्वाच्या बातम्या
VIDEO: बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक, कुर्ल्यातील ऑफिस फोडले
एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुखपदी बसू शकतात का? वाचा काय आहेत शिवसेनेचे नियम
“शिंदे गटाने अजून पाठिंबा काढलेला नाही, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अजूनही मजबूत”
वयाच्या ९१ व्या वर्षी चौथ्यांदा घटस्फोट घ्यायला निघालेत आजोबा, पत्नीला देणार ‘एवढ्या’ कोटींची पोडगी