घराणेशाहीवरून नेहमीच सत्ताधारी पक्षामध्ये आणि विरोधकांमध्ये वादविवाद होत असतात. यावरून अनेक नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. भाजप नेहमी राष्ट्रवादीवर घराणेशाहीवरून टीका करत असते. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपातील घराणेशाहीवर भाष्य केले आहे.
केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची राजकारणातील वंशावळ ट्विट करत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे की, लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण. घराणेशाहीला विरोध करता करता भाजपात कधी घराणेशाही घुसली भाजपाला समजलच नाही? घराणेशाही च्या विरोधात लढणारी पार्टी म्हणे.
पार्टी विथ डिफरेन्स असं ट्विट करत त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नात्यातील तिघांचे फोटो आणि त्यांच्या राजकारणातील पदाची माहिती दिली आहे. या तीनही उमेदवारांना भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले आहे.
त्यात राजनाथ सिंह यांचा मुलगा, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे नातू, खासदार हुकूम सिंग यांची मुलगी यांचे फोटो आहेत. तरीही भाजपमध्ये घराणेशाही नाही बरं का? असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. त्यांचे हे ट्विट सध्या खुप व्हायरल होत आहे. रुपाली ठोंबरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यापासून त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
त्यांनी भाजपला अनेकवेळा लक्ष्य केले आहे. दरम्यान काही दिवसांपुर्वीच मोदींनी घराणेशाहीवर एक वक्तव्य केलं होतं. संविधान दिनादिवशी मोदी म्हणाले होते की, राजकीय पक्षातील घराणेशाही लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. एका पक्षाची सूत्रं पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याच्या हातात राहणं लोकशाहीच्या विरोधात आहे.
ज्यांनी लोकशाही मूल्य गमावलं आहे ते लोकशाहीचं संरक्षण कसं करु शकतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. पंतप्रधान मोदी असेही म्हणाले की, भारत एका अशा संकटाकडे जात आहे जो संविधानाशी समर्पित असलेल्या लोकांसाठी चिंतेचा विषय आहे. आपल्या चांगल्या गुणांच्या आधारे एका परिवारातून अनेक लोकं राजकारणात येत असतील तर ती घराणेशाही नसते, असं मोदी म्हणाले होते.
लोका सांगे ब्रम्हज्ञान
स्वतः कोरडे पाषाणघराणेशाहीला विरोध करता करता भाजपात कधी #घरणेशाही घुसली भाजपाला समजलच नाही?#घराणेशाही च्या विरोधात लढणारी पार्टी म्हणे
पार्टी विथ डिफरेन्स pic.twitter.com/bRW1bdMppI— Rupali patil thombare (@Rupalispeak) January 17, 2022
महत्वाच्या बातम्या
पशुसंवर्धन विभागाची जबरदस्त योजना! ‘या’ व्यवसायासाठी मिळणार ५० लाखांचे अनुदान; वाचा कसा घ्यायचा लाभ
वडिलांच्या उपचारासाठी तीन बहिणींची मैदानावर धावाधाव; बक्षिसांच्या रकमेतून औषधोपचार
विराटच्या राजीनाम्यानंतर रोहितने केलेल्या ‘या’ पोस्टने क्रिडाविश्वात उडाली खळबळ; म्हणाला…
पहिल्याच सामन्यात ५ विकेट घेणाऱ्या विकीला एकेकाळी सराव करणेही झाले होते अवघड