Share

राज ठाकरेंची सभा ही भाजपची सभा होती, त्यांनी युटर्न घेतलाय; रुपाली पाटलांचा राज ठाकरेंना टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत एक भाषण दिले होते. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केले होते. त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली होती. तसेच मशिदींवरील भोंग्यांबाबतही भाष्य केले होते. (rupali patil criticize raj thackeray)

राज ठाकरे यांच्या या भाषणामुळे राज्यभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसने राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच मनसेतील मुस्लिम नेत्यांनीही यावर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता.

पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही राज ठाकरेंच्या या भूमिकेवर राजकीय अडचण होत असल्याचे म्हटले होते. तसेच मी माझ्या प्रभागात भोंगे लावणार नाही. माझ्या प्रभागात शांतता कशी राहील, यासाठी मी प्रयत्न करेन, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.

आता वसंत मोरे यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वसंत मोरे यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. बहिण म्हणून माझा त्यांना पाठिंबा आहे. कारण ते लोकप्रतिनिधी आहे, असे रुपाली पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच यावेळी बोलताना रुपाली पाटील यांनी राज ठाकरेंनाही टोला लगावला आहे. राज ठाकरेंची सभा ही भाजपची सभा होती. राज ठाकरेंनी युटर्न घेतला आहे. असे होईल असे कोणाला वाटले नव्हते, असे रुपाली पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

दरम्यान, मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदींवरील भोंगे खाली उतरवावे, हा निर्णय सरकारने घ्यावा. निर्णय घेतला नाही, तर मशिदींसमोर हनूमान चालिसाचे स्पीकर लावले जातील, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

महत्वाच्या बातम्या-
दिल्लीच्या क्लबमध्ये हनी सिंगला चार जणांनी केली मारहाण, शिवीगाळ करत जीवे मारण्याची दिली धमकी
भारतातही श्रीलंकेसारखी परिस्थिती? अनेक राज्य झालेत कर्जबाजारी, मोफत योजनांवर लवकरच येणार बंदी?
आता ठाकरे सरकारही मशिदींवरील भोंग्यांबाबत आक्रमक, गृहमंत्र्यांनी घेतली ‘ही’ ॲक्शन

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now