rupali patil criticize bjp by narhari zirval | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडून शिंदे-भाजपचे सरकार आले आहे. या सरकारला सुद्धा जवळपास तीन महिने उलटून गेले आहे. त्यानंतर राज्यातील ग्रामपंचायती निवडणूका होताना दिसत आहे. राज्यातील १८ जिल्ह्यातील ८२ तालुकांमधील १ हजार १६५ ग्रामपंचायतीच्या निवडणूकांसाठी मतदार पार पडले आहे.
या निवडणूका झाल्यानंतर आता याची मतमोजणी सुरु झाली आहे. नुकताच आता नाशिक-पेठ तालुक्यात निकाल लागला आहे. ६९ ग्रामपंतायचीच्या निवडणूकीत भाजपला एकही जागा मिळवता आलेली नाही. राष्ट्रवादीने या ठिकाणी २१ जागांवर विजय मिळवला आहे.
भाजप आणि शिंदे गटाला याठिकाणी एकही जागा मिळवता आलेली नाही. पेठ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना दुसऱ्या जागी आहे. याठिकाणी राष्ट्रवादीला २१, शिवसेनेला १५, अपक्ष ३१, माकप १, तर कांग्रेस १ असा निकाल लागला आहे.
या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटीला ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. झाडी, डोंगर, हाटील अन बघून झाली असेल हिरवळ, पेठ भाजपामुक्त करणारे बघूनघ्या आमदार झिरवळ. नाशिक – पेठ तालुक्यात 69 ग्रामपंचायती भाजपला भोपळा. ग्रामपंचायत निवडणुकीत नाशिक – पेठ तालुका भाजपामुक्त केल्या बद्दल आमदार नरहरी झिरवळ साहेबांचे अभिनंदन, अशी पोस्ट रुपाली पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकींचे निकाल घोषित झाले आहे. आतापर्यंत चारही तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचा निकाल हाती लागला आहे. त्यानुसार राष्ट्रवादीच पुढे असल्याचे दिसत आहे. तसेच शेवटच्या वेळेस शिवसेनेन मुसंडी मारली आहे.
पेठ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतमजणीच्या सर्व १४ फेऱ्या पुर्ण झाल्या आहे. विशेष गोष्टी म्हणजे भाजप आणि शिंदे गटाला एकही जागा मिळवता आलेली नाही. एकनाथ शिंदे यांच्या गटाला बंडखोरीचा मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. तसेच भाजपलाही ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत धक्क्यावर धक्के बसताना दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
devendra fadanvis : फडणवीसांच्या खेळीमुळे आशिष शेलारांचा झाला गेम, भाजपने माघार घेतल्यामुळे पडले तोंडघशी
Sanjay Raut : माघार घेतली नसती तरी आम्ही जिंकलोच असतो, राऊतांनी थेट तुरूंगातून सांगीतला मताधिक्याचा आकडा
Shakti Kapoor : अभिनेत्रीचे शक्ती कपूरवर गंभीर आरोप, म्हणाली, बोल्ड सीन करताना तो एवढा उत्तेजीत झालता कि….