Share

politics : बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा रुपाली पाटलांनी घेतला समाचार, म्हणाल्या, पुढच्या सात जन्मातही…

sharad pawar & devendra fadanvis

politics : मागच्या काही दिवसांपासून बारामती काबीज करण्याचा भाजपने चंगच बांधला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. त्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बारामती दौरा केला. त्यानंतर मात्र भाजपचा बारामती जिंकण्याचा इरादा देशासमोर स्पष्ट झाला. आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीबाबत मोठे वक्तव्य केले. त्या वक्तव्याला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देखील देण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘घड्याळ लवकरच बंद पाडणार. तेही बारामतीमधून.. त्यांना कळणारही नाही. अशा पद्धतीने आम्ही घड्याळ बंद पाडू,’ अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. त्याला राष्ट्रवादी नेत्या रूपाली पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

‘घड्याळ कुणाच्या बापाचा जहागिरी नाही. याच काय पुढच्या सात जन्मातही घड्याळ बंद पाडणे शक्य नाही, अशा शब्दात रूपाली ठोंबरे यांनी त्यांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘हिटलरशाहीने आणि यंत्रणेवर दबाव आणल्याने तुम्ही सत्तेमध्ये आला आहात. पण घड्याळ बंद पाडणे ही तुमची जहागिरी नाही,’ अशा शब्दात रूपाली पाटील यांनी भाजपला चांगलेच खडसावले.

दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी घड्याळ बंद पाडण्याबाबत बोलताना पुढे असे विधान केले की, ‘प्रवेशाचे बॉम्बस्फोट फुटणे अजून बाकी आहे,’ या वक्तव्याने मात्र राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. याचा अर्थ भाजपमध्ये मोठे प्रवेश येत्या काळात राष्ट्रवादीतून होऊ शकतात. याबाबत सुचक इशारा यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला आढळतो.

मात्र राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये येत्या निवडणुकीमध्ये बारामतीत काय घमासान होते? हे येत्या काळात पहावे लागेल. मात्र भाजपने सर्वच बाजूने तयारी करण्यास, रणनीती आखण्यास सुरुवात केली असल्याचे भाजप नेत्यांच्या हालचालींवरून स्पष्ट होते.

राष्ट्रवादी भाजपच्या या प्रयत्नांना कशाप्रकारे हाणून पाडते? अथवा भाजप आपल्या रणनीतीमध्ये कितपत यशस्वी होते? बारामती जिंकण्यासाठी भाजपकडून चाललेल्या प्रयत्नांना सपशेल फोल ठरवण्यासाठी राष्ट्रवादीकडून कोणत्या प्रकारची रणनीती आखली जाणार? या प्रश्नांची उत्तरे येत्या काळात जनतेला मिळतील. मात्र सध्या तरी चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप नेत्या रूपाली पाटील यांच्यामध्ये वाद- प्रतिवादाचा सामना पाहायला मिळतोय.

महत्वाच्या बातम्या-
Raj Thackeray : मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका, राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र; लटके बिनविरोध निवडून येणार?
Uddhav Thackeray : मनोहर जोशींच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा गेम केला, शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट
Kishori Pednekar : शिवसेनेत अंतर्गत धुसफूस, किशोरी पेडणेकर नाराज? थेट उद्धव ठाकरेंकडे केली तक्रार

 

राजकारण ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now