rupali chakankar angry on chitra wagh | बिग बॉस फेम उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ तिच्याविरोधात आक्रमक झाल्या आहे. पोलिसांनी उर्फीवर कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ या करत आहे.
तसेच चित्रा वाघ या रस्त्यावर देखील उतरल्या होत्या. उर्फी जिथे दिसेल तिथे तिच्या कानशिलात लगावेल, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले होते. तसेच चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही यावरुन लक्ष्य केलं होतं.
आता चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर रुपाली चाकणकरांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन आयोगाला जाब विचारणाऱ्या चित्रा वाघांवर रुपाली चाकणकर या चांगल्याच भडकल्या आहे. त्यांनी चित्रा वाघ यांना गांधारी असे म्हटले आहे.
राज्य महिला आयोगाकडे १०,९०७ तक्रारी आल्या आहेत, त्यापैकी ९,५२० तक्रारींचा आम्ही निकाल लावला आहे. राज्य महिला आयोग व्यापक स्वरुपात काम करत आहे. त्यामुळे आयोगाने काय करायला पाहिजे हे कोणी सांगू नये, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
तसेच चित्रा वाघ यांना महिलांवर अन्यात झाला की वेदना होतात. मंंगेश मोहिते, राहूल शेवाळे आणि श्रीकांत देशमुख यांनी महिलांवर केलेल्या अन्यायाकडे सुद्धा ते लक्ष देतील. तसेच ते केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन पीडितांना न्याय मिळवून देतील, असे म्हणत चाकणकरांनी टोला लगावला आहे.
ज्या व्यक्तींवर अत्याचारांचे, बलात्कारांचे आरोप आहे, असे राहूल शेवाळे एका सार्वजनिक कार्यक्रमात व्यासपीठावर बसतात. तेव्हा चित्रा वाघ या काय गांधारीच्या रुपात असतात का? असा प्रश्न पडतो, असेही रुपाली चाकणकरांनी म्हटले आहे.
तसेच कोणी कोणते कपडे परीधान करायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना तो अश्लील वाटत असेल. पण इतरांना तो अश्लील वाटत नसेल. त्यामुळे आयोग अशा गोष्टींमध्ये वेळ घालवू शकत नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
रितेश-जेनेलियाच्या वेड चित्रपटात काम करणारी ‘ही’ बालकलाकार कोण आहे माहितीये का? वाचून शॉक व्हाल
ved : रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ने लावले लोकांना ‘वेड’, ६ दिवसांत जमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
सूर्या-अक्षरची झंझावाती खेळी व्यर्थ; कर्णधार हार्दिकच्या ‘या’ घोडचुकीमुळे टिम इंडियाचा पराभव