उत्तर प्रदेशच्या लखनऊमधून एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. पोलीस मुख्यालयात तैनात कॉन्स्टेबल रुची सिंगच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी रविवारी तहसीलदार पद्मेश श्रीवास्तव, त्यांची पत्नी प्रगती आणि प्रतापगडच्या राणीगंज तहसीलमध्ये तैनात असलेला मित्र नामवार यांना अटक केली. (ruchi singh murder case)
बिजनौरची रहिवासी असलेल्या महिला कॉन्स्टेबल रुचीचा मृतदेह गुरुवारी लखनऊच्या पीजीआय परिसरातील माटीमध्ये पडलेला आढळून आला. त्यानंतर या प्रकरणात दोषी आढळल्यामुळे पद्मेश श्रीवास्तवला, त्याची पत्नी आणि मित्राला अटक करण्यात आली आहे.
रुचीच्या भावाच्या तक्रारीवरून पीजीआय पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसीलदार पद्मेश यांचे लेडी कॉन्स्टेबल रुचीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. जेव्हा रुचीने पद्मेशवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली तेव्हा तिच्यापासून स्वत:ची सुटका करण्यासाठी त्याने तिची हत्या केली आहे.
डीसीपी अमित आनंद यांनी सांगितले की, रुची आणि पद्मेश यांची फेसबुकच्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी मैत्री झाल्याचे तपासात उघड झाले आहे. हळू हळू दोघे जवळ आले आणि दोघांचे प्रेमसंबंध जुळले. दरम्यान, रुचीने पतीला घटस्फोट देऊन पद्मेशवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.
रुचीपासून सुटका करून घेण्यासाठी पद्मेशने तिच्या हत्येचा कट रचला. त्याने रुचीला १२ फेब्रुवारीला भेटण्यासाठी बोलावले. पद्मेश आणि त्याचा मित्र नामवार यांनी जेवणात बेशुद्धीचे औषध मिसळून तिला खाऊ घातले. यानंतर बेशुद्धावस्थेत तिची गळा आवळून हत्या करण्यात आली. यानंतर मृतदेह पीजीआयच्या माटी परिसरात फेकून तेथून पळ काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुचीचे २०१९ मध्ये कॉन्स्टेबल नीरजसोबत लग्न झाले होते. त्याच वर्षी ती पोलिसात हवालदार म्हणून रुजू झाली. मात्र लग्नापूर्वीपासूनच रुची आणि पद्मेशचे अफेअर सुरू होते. नोकरी मिळाल्यानंतर रुचीने पती नीरजविरुद्ध हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल केला. यानंतर पद्मेशच्या सांगण्यावरून त्यांनी घटस्फोटाची केस दाखल केली आणि काही महिन्यांनी दोघांचा घटस्फोट झाला.
त्यानंतर रुचीने पद्मेशवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तेव्हा पद्मेशने लग्न झाल्याचे सांगितले. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. दरम्यान, पद्मेशने हा प्रकार पत्नी प्रगतीला सांगितला. त्यानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होत होते, पत्नी प्रगती आणि रुचीमध्ये मोबाईलवरून वादही होत होता. यानंतरच पद्मेशने रुचीच्या हत्येचा कट रचला आणि तिची हत्या केली.
महत्वाच्या बातम्या-
तुमच्याही कानात खाज येत असेल तर दुर्लश करू नका, वाचा त्यावरील उपाय आणि कारणे
मलायकाच्या फिगरसमोर सगळे झाले फेल, बिकीनीमधील हॉट फोटो पाहून तु्म्हीही घायाळ व्हाल
अय्यरच्या दमदार कामगिरीनंतर हार्दिक पांड्यावर व्हायरल होतायत मीम्स, T20 वर्ल्डकपचा मार्गही होणार बंद?






