..तर शेकडो मुस्लिम महिला मंदिरासमोर बसून कुराण वाचतील, सपा महिला नेत्याचा इशारा

महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा मुद्दा जोर धरत आहे. अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि काही हिंदू संघटनांनी मशिदींवरील भोंगे काढले नाही, तर मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करण्यात येईल, अशी घोषणा केली. (rubina khanam warning hindu orgarnization)

त्यानंतर आता याप्रकरणी समाजवादी पक्षाच्या महिला नेत्या रुबिना खानम यांनी हिंदूंना थेट धमकी दिली आहे. मुस्लिम धर्माला लक्ष्य करून मशिदींवर लावलेले लाऊडस्पीकर हटवण्याचा प्रयत्न केल्यास शेकडो मुस्लिम महिला मंदिरांसमोर बसून कुराण वाचतील, असे त्यांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलीगढमधील हिंदुत्ववादी संघटनांनी २१ चौकांमध्ये लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाचण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सपा महानगर अध्यक्षा रुबिना खानम या आक्रमक झाल्या असून त्यांनीही संघटनांना मंदिरासमोर मुस्लिम महिला कुराण वाचतील, असा इशारा दिला आहे.

BJYM आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) द्वारे लाऊडस्पीकर वाद निर्माण केला जात आहे आणि रमजान महिन्यात अराजकता निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात, असे रुबिना खानम यांनी म्हटले आहे. अशा गोष्टींना आळा घालण्याचे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले.

जर कोणी इतर धर्म आणि लोकांच्या श्रद्धा दुखावल्या तर शेकडो मुस्लिम महिला मंदिरांसमोर लाऊडस्पीकरवर कुराण वाचतील, असा इशारा रुबिना यांनी यावेळी दिला आहे. याआधी कर्नाटक हिजाब प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. जो कोणी हिजाबवर हात टाकेल, त्याचे हात कापले जातील, अशी धमकी त्यांनी दिली होती.

रुबिना यांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्या म्हणताना दिसून येत आहे की, मी रुबिना खानम आहे. कर्नाटक हिजाब प्रकरण हा आपल्या देशातील बहिणी आणि मुलींवर झालेला हल्ला आहे. आमच्या हिजाबला हात घालणाऱ्यांचे हात आम्ही कापून टाकू. भारत हा विविधतेचा देश आहे. कपाळावर टिकली असो, पगडी असो, हिजाब असो… हे सर्व भारतीय संस्कृतीचा भाग आहेत.

तसेच कोणी काय लावतं, परीधान करतं यावर राजकारण करणे चुकीचे आहे. मी त्यांना सांगू इच्छिते की, महिलांना कमकुवत समजण्याची चूक करू नका. सरकार कोणत्याही पक्षाचे असो. जर तुम्ही महिलांच्या हिजाबवर हात टाकण्याचा प्रयत्न केलात तर झाशीची राणी आणि रजिया सुलतान बनून तुमचे हात कापून टाकू, असा इशारा रुबिना खानम यांनी दिला होता.

महत्वाच्या बातम्या-
चहलने हॅंट्रिक घेताच स्टॅंडमध्ये धनश्री आनंदाने मारू लागली उड्या, व्हिडीओ होतोय व्हायरल
सिव्हील इंजिनीअर बनला लखनऊ कबाडीवाला, आता महिन्याला कमावतोय ७० हजार रुपये, वाचा यशोगाथा
‘ही’ खेळी केल्यास राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव होणार, विरोधकांनी आखला मास्टर प्लॅन