भारताचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतची (rishabh pant) हरियाणाच्या एका क्रिकेटपटूने 1.63 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. मृणाक सिंगने (mrunak singh) पंतला महागडी घड्याळे चांगल्या किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवून पंतची फसवणूक केली आहे. याशिवाय मृणाकने पंतकडून दागिन्यांसह चैनीच्या वस्तूही घेतल्या होत्या, त्या त्याने परत केल्या नाहीत.
मृणाक सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहे. एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याला जुहू पोलिसांनी अटकही केली होती. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ऋषभ पंतचे वकील एकलव्य द्विवेदी यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे.
एकलव्य द्विवेदी म्हणाले, मुळात ही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत केस आहे जिथे आरोपी श्री मृणाक सिंग याने दिलेला चेक अपुऱ्या निधीमुळे अवैध ठरला आहे. मृणाकने पंतला सांगितले होते की, त्याने आलिशान घड्याळे, बॅग, दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.
त्याने पंतला आपल्यासाठी लक्झरी घड्याळे आणि इतर वस्तू अत्यंत स्वस्तात खरेदी करू असे खोटे आश्वासनही दिले होते. द्विवेदी पुढे म्हणाले, ‘यानंतर पंतने मृणाक सिंगकडे मोठी रक्कम हस्तांतरित केली. यासोबतच त्याने मृणाकला काही मौल्यवान वस्तूही दिल्या, जेणेकरून तो त्या वस्तू पुन्हा विकून पंतला मोठा नफा मिळवून देऊ शकेल. नंतर प्रकरण पुढे गेल्यावर आम्ही त्याला कायदेशीर नोटीस पाठवली होती.
यानंतर, 1.63 कोटी रुपये परत करण्याचा परस्पर करार झाला, ज्यासाठी मृणाक सिंगने आम्हाला धनादेश दिला होता. आम्ही हा धनादेश बँक अधिकार्यांना सादर केला तेव्हा आम्हाला रिटर्न मेमो मिळाला की अपुऱ्या निधीमुळे चेक बाऊन्स झाला आहे. द्विवेदी म्हणाले की, फेब्रुवारी 2021 मध्ये चेक बाऊन्स झाल्यामुळे व्याजासह ही रक्कम 1.8 वरून 1.9 कोटी रुपये झाली आहे.
द्विवेदी म्हणाले, ‘मजिस्ट्रेटसमोर या खटल्याच्या मागील सुनावणीत तो हजर नव्हता. त्यामुळे दंडाधिकाऱ्यांनी तिथल्या एसएचओला 19 जुलैला आरोपीला हजर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या दिवशी त्याला हजर करून त्याचा जबाब नोंदवला जाणार आहे. आम्ही कलम 143-अ अंतर्गत अंतरिम भरपाईसाठी अर्ज देखील दाखल केला आहे. त्यावरही विचार करून युक्तिवाद ऐकून घेतला जाईल.
महत्वाच्या बातम्या
“उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे दहशतवादी कसाबसोबत संबंध”
“होय माझे शरद पवार यांच्यासोबत चांगले संबंध आहेत आणि मला या गोष्टीचा गर्व आहे” – ब्रिजभूषण सिंग
७५ पैशांचा शेअर गेला २ हजारावर; १ लाखाचे झाले २७ कोटी; ‘या’ शेअरचा बाजारात धुमाकूळ
४ करोडचं घड्याळ ते चार्टड प्लेन, Jr NTR ची संपत्तीचा आकडा वाचला तर बॉलिवूडकरही पडतील फिके