बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा बहुप्रतिक्षित आगामी ‘आरआरआर’ या चित्रपटासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ७ जानेवारी रोजी हा चित्रपट तेलुगूसह तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत देशभरात प्रदर्शित होणार होता. मात्र, आता चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. चाहत्यांचा बहुप्रतीक्षित ‘आरआरआर’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेवेळी लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे सिनेमागृह आणि चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले होते. तसेच आताही नवीन निर्बंधामुळे यो दोन्ही इंडस्ट्रीना नुकसान सहन करावे लागत आहे.
या निर्बंधामुळे नुकतीच प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंहच्या ८३ चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झाला आहे. ही परिस्थिती पाहता आरआरआरच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान अद्याप निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन प्रदर्शनाची तारीख जाहिर केली नाही.
‘आरआरआर’ चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच चित्रपट व्यापार विश्लेषक यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये लिहिण्यात आले की, ‘आमच्या अथक प्रयत्नानंतरही काही परिस्थिती आमच्या नियंत्रणाबाहेर आहे. अनेक राज्यात सिनेमागृह बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचा उत्साह टिकवून ठेवण्यास सांगण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. परंतु, भारतीय चित्रपटसृष्टीचे वैभव आम्ही परत मिळवून देऊ आणि योग्य वेळी देऊ, याचा आम्ही तुम्हाला वचन देतो’.
Keeping the best interests of all the involved parties in mind, we are forced to postpone our film. Our sincere thanks to all the fans and audience for their unconditional love. #RRRPostponed #RRRMovie pic.twitter.com/CEtoV0vaYi
— DVV Entertainment (@DVVMovies) January 1, 2022
‘आरआरआर’ हा एस एस राजमौली यांचा बिग बजेट चित्रपट आहे. घोषणेपासूनच हा चित्रपट फारच चर्चेत असून अल्लूरी सीतारामराजू आणि कोमरम भीम या दोन क्रांतिकारकांवर आधारित हा चित्रपट आहे. या दोन क्रांतिकारकांनी ब्रिटीश राज आणि हैदराबादच्या निजामांविरुद्ध युद्ध केले होते.
या चित्रपटात अभिनेता ज्यूनियर एनटीआर कोमरम भीमच्या भूमिकेत तर रामचरण अल्लूरी रामाराजूच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात अल्लूरी रामराजू यांच्या पत्नीची म्हणजेच अल्लूरी सीता ही भूमिका साकारत आहे.
एनटीआर, रामचण आणि आलियासोबत या चित्रपटात अजय देवगनसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. ट्रेलर पाहून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, आता चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याने चाहते नाराज झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
शौर्याची भाषा करणारे गप्प का? ५६ इंचाची छाती चायना माल निघाला का? प्रसिद्ध गायकाची मोदींवर टिका
‘बिग बॉस’ फेम सोनाली पाटीलचे इन्स्टाग्रामवर झाले २००K फॉलोअर्स; पोस्ट शेअर करत चाहत्यांचे मानले आभार
काजल अग्रवाल लवकरच होणार ‘आई’, ब्लॅक ड्रेसमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो झाला व्हायरल
जॉन अब्राहम आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण; पोस्ट शेअर करत दिली माहिती