Homeताज्या बातम्याजॉन अब्राहम आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण; पोस्ट शेअर करत दिली माहिती

जॉन अब्राहम आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण; पोस्ट शेअर करत दिली माहिती

बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढताना दिसून येत आहे. एकामागून एक अनेक सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आता या यादीत बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रूंचाल यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. जॉनने सोशल मीडियाद्वारे त्याला आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे.

जॉनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिले की, ‘तीन दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो. मात्र, मला नंतर कळाले की ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होती. आता प्रिया आणि माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे’.

जॉनने पुढे लिहिले की, ‘आम्ही दोघेही सध्या घरातच क्वारंटाईन आहोत. तसेच आम्ही कोणाच्याही संपर्कात आलेलो नाही. दोघांचेही लसीकरण झाले असून आम्हाला सौम्य लक्षणे जाणवत आहेत. कृपया सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. तसेच मास्कचा अवश्य वापर करा.

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत करीना कपूर, अमृता अरोरा, सीम खान, माहिप कपूर, अर्जून कपूर, अंशुला कपूर, रिया कपूर, नोरा फतेही, शिल्पा शिरोडकर, मृणाल ठाकूर या सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. अजूनही अनेक सेलिब्रिटी या कोरोनाच्या विळख्यात सापडत असून सिनेसृष्टीत सध्या चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, देशभरात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खबरदारीचे उपाय म्हणून अनेक राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आली आहे. महाराष्ट्रातही रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी करण्यात आली आहे. तसेच सर्वांनी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची सूचना प्रशासनाद्वारे वारंवार देण्यात येत आहे.

VIDEO:‘त्या’ अभिनेत्रीला मिठी मारणे रितेशला पडले महागात, घरी गेल्यानंतर जेनेलियाने धु-धु धुतला
साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीवर का आली सर्वांपासून तोंड लपवायची वेळ? जाणून घ्या कारण
‘शमिताला वोट करा यावेळी ती जिंकलीच पाहिजे’, शिल्पा शेट्टीचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

रोहनमसोबतच्या ब्रेकअपबाबत सुष्मिताचा मोठा खुलासा, म्हणाली, ‘मी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले’