Share

रामदास आठवलेंनी राज्य सरकारकडे केली ‘ही’ मागणी; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

ramdas athawale

राज्यात नवं सरकार स्थापन झालं आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिंदेशाही पर्वास सुरुवात झाली आहे. शिंदे यांनी बंड केलं अन् राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर विधान सभेत शिंदे सरकारची अग्निपरीक्षा देखील झाली.

बहुमत चाचणीत शिंदे सरकार पास झालं. तर आता नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधीची चर्चा रंगली आहे. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ केव्हा तयार होणार? कॅबिनेटमध्ये कुणाची वर्णी लागणार? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होतं आहेत. अशातच रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी एक मोठा दावा केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी म्हंटलं आहे की, ‘मंत्रीपदासाठी मी फडणवीसांकडे धरला आहे. यासाठी मी फडणवीसांना भेटलो आहे. त्यांनी सांगितलंय की सुरुवातीचं मंत्रीमंडळ लहान असल्या कारणाने पहिल्या वेळेत आरपीआयला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र मंत्रीमंडळ विस्तार होईल, तेव्हा रिपाइंचा विचार केला जाईल.’

पुढे बोलताना आठवले यांनी म्हंटलं आहे की, ‘मंत्रीपदासाठी माझ्याकडे १०० पेक्षा जास्त नावं आली आहेत. सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही इतकी वर्ष तुमच्यासोबत काम करत आहोत. त्यामुळे आमचा मंत्रीपदासाठी विचार व्हावा, अशी अनेकांची भावना असल्याच मत आठवले यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, शिंदे – फडणवीस सरकारमध्ये आम्हाला एक मंत्रीपद मिळावं, ३-४ चेअरमनपदं, काही उपाध्यक्षपदावर आरपीआयचे प्रतिनिधी घ्यावेत अशी मागणी आम्ही केली असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. यामुळे आता मंत्रिमंडात आठवले यांच्या वाट्याला किती मंत्रिपद येतात? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.

तर दुसरीकडे, आता शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला समोर आला आहे. याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व सामान्य प्रशासन खात असू शकतं. याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असू शकते.

गृहखात्याबरोबरच अर्थखातेही फडणवीसांकडे जाणार असल्याच बोललं जातं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील माजी मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याच बोललं जातं आहे. शिंदे गटातील नऊ माजी मंत्र्यांपैकी एक किंवा दोन जणांना पुन्हा संधी न देण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :-
“आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग…”, मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
शिवसेनेच्या आंदोलनात लहान मुलांना पाहून भाजपने लगावला टोला, म्हणाले, शिल्लक सेनेकडे…
तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
आमदारांपाठोपाठ खासदारांचाही उद्धव ठाकरेंना धक्का, उचललं मोठं पाऊल, शिवसेनेचं काय होणार?

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now