Share

२ लाखांची करकरीत रॉयल एनफिल्डची ‘ही’ बाईक फक्त २२ हजारात आणा घरी; वाचा भन्नाट ऑफर

देशातील टू व्हीलर सेक्टरमध्ये क्रूझर बाइक सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात नवनीन बाईक्स लाँच होत आहे. या बाइक्स त्यांच्या इंजिन, पॉवर आणि डिझाइनसाठी पसंत केल्या जातात. पण पसंतीनंतरही अनेकदा लोक त्यांच्या उच्च किंमतीमुळे त्या खरेदी करू शकत नाहीत. (royal enfield in only 22 thousand)

आता क्रुझर बाईक घेता यावी यासाठी रॉयल एनफिल्डने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर दिली आहे. रॉयल एनफिल्डने क्लासिक ३५० हॅल्सियन सिरिजची बाईक लाँच केली आहे. लोकांना ही बाईक खरेदी करता यावी यासाठी त्यांनी आपल्या ग्राहकांना एक ऑफर दिली आहे. जिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ड्युअल एबीएस चॅनलसह रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० हॅल्सियन सीरीजची किंमत रु. १,९८,९७१ (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते जी रोडटॅक्स धरुन रु. २,२०,५५८ पर्यंत जाते. पण रॉयल एनफिल्डचा आम्ही असा एक प्लॅन सांगत आहोत ज्यामध्ये तुम्हाला ही बाईक घेण्यासाठी २ लाख रुपये खर्च करावे लागणार नाहीत.

ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही ही बाईक खरेदी केली तर बँक यासाठी १,९८,५५८ रुपये कर्ज देईल. हे कर्ज मिळाल्यानंतर, तुम्हाला किमान डाउन पेमेंट म्हणून २२,००० रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर दरमहा ६,०४१ रुपये मासिक ईएमआय द्यावा लागेल.

Royal Enfield Classic 350 Halcyon Series ड्युअल ABS च्या फिचरसोबत येते. या बाईकच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी, बँकेने ३६ महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे. ज्या दरम्यान बँक कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.७ टक्के दराने व्याज आकारेल.

फायनान्स प्लॅन अंतर्गत उपलब्ध कर्ज, डाउन पेमेंट, ईएमआय आणि व्याजदरांची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर, तुम्ही या बाइकचे इंजिन ते मायलेजपर्यंतचे तपशील जाणून घेऊ शकता.बाईकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यामध्ये ३४९.३४ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन २०.२१ पीएस पॉवर आणि २७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

बाईकच्या मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० हॅल्सियन सीरीज ड्युअल एबीएस वेरिएंट ४१.५५ kmpl चा मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये, कंपनीने तिच्या पुढच्या आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक लावले आहेत, ज्यामध्ये ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-
रोहित शर्माच्या मुलीच्या ‘त्या’ बोबड्या बोलाने जिंकली सर्वांची मनं;म्हणाली, डॅडाला कोरोला झालाय, तिथं फक्त…
बंडखोर आमदाराने फेसबूक पोस्ट करत स्वत:लाच म्हटले गद्दार; वाचा नेमकी काय आहे पोस्ट
बंडखोर आमदारांना पश्चाताप होणार, पुढच्या निवडणूकीत ७६% शिवसैनिक जागा दाखवणार; सर्वेतून झाले उघड

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now