Share

…म्हणून भारतातील हॉटेलमध्ये १३ नंबरची रुम नसते; कारण वाचून बसेल धक्का

सध्या प्रवास हा खुप वाढला आहे. त्यामुळे राहण्यासाठी सर्वच हॉटेलचा वापर करतात. अशात हॉटेलमध्ये काही गोष्टी या खुप चर्चेचा विषय ठरत असतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे रुम नंबर १३. तुम्हाला अनेक हॉटेलमध्ये १३ नंबरची खोली दिसणार नाही, त्यामागचे कारणही हैराण करणारे आहे. आज आपण तेच जाणून घेणार आहोत. (room number 13 secrets)

खरे पाहता पाश्चात्य संस्कृतीनुसार १३ हा अंक अतिशय अशुभ आहे. त्यामुळे लोक त्यांच्या हॉटेलमध्ये १२ नंतर थेट १४ क्रमांकाची खोली बनवतात. तिथली ही संस्कृती पाहता भारतातही त्याची सुरुवात झाली आहे. भारतातल्या अनेक हॉटेलमधून १३ नंबरच्या खोल्या गायब आहेत.

हॉटेलमध्ये १३ क्रमांकाची खोली नसल्याबद्दल अनेक प्रकारचे दावे केले जातात. त्याचा धर्माशीही संबंध जोडला जातो. असे म्हटले जाते की प्रभु येशू ख्रिस्ताचा एका माणसाने विश्वासघात केला होता. हा मनुष्य येशूंच्या बरोबर तेराव्या खुर्चीवर बसला होता. तेव्हापासून १३ हा अंक पाश्चात्य संस्कृतीच्या लोकांच्या दृष्टीने वाईटाचे प्रतीक बनला आहे.

लोक कोणत्याही प्रकारे या नंबरशी आपले नाव जोडू इच्छित नाहीत. हॉटेलमधल्या खोलीची संख्याच नाही, तर इमारतींबद्दल बोलायचे झाले तर कोणत्याही पाश्चात्य देशांमध्ये इमारतीत तेरावा मजला बांधला जात नाही. तिथे १२ नंतर थेट १४ वा मजला येतो.

भारतातील बहुतांश हॉटेल्स पर्यटनाच्या उद्देशाने उघडण्यात आली आहेत. यामध्ये बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेची काळजी घेतली जाते. परदेशी लोकांसाठी १३ हा क्रमांक अशुभ असल्याने भारतातील हॉटेल्सही १३ क्रमांकाच्या खोल्या बनवत नाहीत.

तसेच चंदीगडमध्ये तर प्रत्येक हॉटेलमधून १३ नंबरची रुम गायब दिसते. येथे १२ व्या नंबरच्या रुमनंतर तुम्हाला थेट १४ नंबरची रुम दिसेल. १३ व्या नंबरच्या भीतीला ट्रीस्कायडेकाफोबिया म्हणतात. फ्रान्समध्ये हॉटेलमध्ये १३ खुर्च्या असतील तर तेही अशुभ मानले जाते.

महत्वाच्या बातम्या-
‘फडणवीसजी..! तुम्ही मुख्यमंत्री असतानाही ओवेसी कबरीवर गेले होते, मग आताच बोंब का?
पश्या मला तुला कडकडून मिठी मारायचीय; धर्मवीर पाहून संतोष जुवेकरची आई झाली भावूक
‘ब्रिजभूषणला काय कळतंय; आम्ही साहेबांसोबत अयोध्येला जाणार,’ उत्तर भारतीयांचा राज ठाकरेंना जाहीर पाठिंबा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now